देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी तब्बल सात ते आठ तास वीज नाही; रहिवाशांसह सरकारी कर्मचाऱ्यांना फटका

महावितरण कंपनीच्या ठाणे शहरातील महत्त्वाच्या वीज वाहिन्यांच्या देखभाल-दुरूस्त्यांची कामे शुक्रवारी हाती घेण्यात येत असून त्यामुळे शहरातील मध्यवर्ती परिसराचा वीज पुरवठा सुमारे सात ते आठ तास खंडित होणार आहे. सकाळी १० ते ६ या वेळात शहराचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. वीजबंदमुळे रहिवाशांना मोठय़ा त्रासाचा सामना करावा लागणार आहे. ठाण्यात शासकीय कार्यालये, खाजगी अस्थापने, व्यापारी, गृहसंकुले आणि रुग्णालयांची मोठी संख्या असून या भागातील नागरिकांना या वीज बंदचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

ठाणे शहराला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या वागळे इस्टेट विभागातील लोकमान्यनगर उपविभाग, कोलशेत उपविभाग, वागळे इस्टेट उपविभाग, ठाणे नगरी विभाग – २ या महत्त्वाच्या भागातून होणारा वीजपुरवठा देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी खंडीत करण्यात येणार आहे.

या विभागांना सर्वाधिक फटका

  • लोकमान्यनगर उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील न्यू प्रगती वीज वाहिनीवरील आर मॉल, सीनेवंडर मॉल, जांगीड हाईट या परिसराचा वीजपूरवठा बंद राहणार आहे. तर हावरे सिटी वीज वाहिनीवरील युरो स्कूल, पारिजात गार्डन, स्वामी समर्थ, रतन तेज, पाचवडा, वडावली नाका.
  • पोखरण वीज वाहिनीवरील श्री डेवलपर्स, असेंट कंस्ट्रक्शन, हिल क्रेस्ट, कॉसमॉस लोंज, मुल्लाबाग, हिल गार्डन, कल्पतरू हिल्स, नवशीबाई कॉम्प्लेक्स, सहयोग कॉम्प्लेक्स, एकमे ओझोन, अगरवाल इस्टेट, आकांक्षा गार्डन.
  • ईन्कंमर वीज वाहिनीवरील मेट्रोपोलिटीअन कंपनी, हिंदुस्तान कोर्जिग कं, महालक्ष्मी डीटीसी, साठेनगर, रोड नं. २२, वरदान बिल्डिंग, महापालिका कार्यालय, एमआयडीसी कॉलनी, विद्युत निरीक्षक कार्यालय, ठाणे जनता सहकारी कार्यालय, एसबीआय बॅंक, विद्युत मेटालिक कं, न्यू रामगोपाल, डम्पिंग रोड, टीएमटी डेपो, हनुमान नगर, राम नगर, सी.पी.तलाव, शांतीनगर.
  • कळवा वीज वाहिनीवरील गणपती पाडा, फुलेनगर, ईश्वरनगर, आनंदनगर, वाघोबानगर, भोलानगर, शिवाजीनगर, सम्राट अशोक नगर, ठाकुरपाडा, मफतलाला कॉलनी, शांतीनगर, गोपाळराव नगर.
  • सॅन्डोझ वीज वाहिनीवरील बाळकुम, माजीवाडा, बायर बिग बाजार, हायलॅंड, कापुरबावडी, बाळकुम पाडा.
  • चेंदणी कोळीवाडा, दादा पाटीलवाडी, स्टेशन परिसर, क्लॉक टॉवर, मार्केट परिसर, टेंभी नाका, आंबेडकर रोड, कोर्ट नाका, चरई, टेकडी बंगला, डॉ. मुस रोड, हरिनिवास सर्कल, दमानी इस्टेट, नौपाडा, खारकळ आळी, पोलिस क्वॉर्टर, गावदेवी, राममारूती रोड, गोखले रोड, बी-केबीन रोड, रवि उदय सोसायटी, सिडको बस स्टॉप, गडकरी रंगायतन, जांभळी नाका