News Flash

विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठय़ाला झटका

वसई शहराला आधीच पाणीसाठा कमी असून त्यात महावितरणाकडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

मागील दोन महिन्यात २४ वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठय़ावर परिणाम झाल्याचे पुढे आले आहे.

वसई-विरारमध्ये दोन महिन्यांत २४ वेळा वीजपुरवठा खंडित

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वसई शहराला आधीच पाणीसाठा कमी असून त्यात महावितरणाकडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. मागील दोन महिन्यात २४ वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठय़ावर परिणाम झाल्याचे पुढे आले आहे. महावितरणाने किमान सूर्या प्रकल्पाचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी विनंती पालिकेने महावितरणाला केली आहे. महावितरणने मात्र विजेची कुठलीच समस्या नसल्याचे सांगितले आहे.

वसई विरार शहराला दररोज २३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा महापालिकेमार्फत केला जातो. त्यामध्ये सूर्या धरण टप्पा १ व ३ मधून एकूण २०० दशलक्ष लिटर, उसगाव २०,  पेल्हार १० असा २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो. (पापडखिंड धरणातील १ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा नुकताच बंद करण्यात आला आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २०० दशलक्ष लिटर्स पाणी हे सूर्या प्रकल्पातून उचलले जाते. पालघरजवळील मासवण येथील उदंचन केंद्रात ते पाणी आणले जाते आणि धुकटण येथील केंद्रात त्याचे शुद्धीकरण केले जाते. मासवण उदंचन केंद्रात ३०० हॉर्स पॉवरचे ७ पंप आहेत तर धुकणट केंद्रात ८०० हॉर्स पॉवरचे ३ आणि ६०० हॉर्स पॉवरचे ४ असे एकूण १४ पंप आहेत. दोन्ही ठिकाणी ३३ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा होतो. उंदचंन केंद्रात पाणी आणणे, ते शुध्दीकरण केंद्रात नेणे आणि तेथून पुरवठा करण्यासाठी मोठय़ा क्षमतेची वीज लागते. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा देखील खंडित होतो. एक मिनिट जरी वीज खंडित झाली की सर्व पंप बंद पडतात. एक पंप पुन्हा सुरू होण्यासाठी १५ मिनिटांचा काळ लागतो. त्यामुळे पाणीपुरवठा बराच काळ खंडित होतो आणि पुढील पाणीपुरवठा देखील अनियमित दाबाने होत असतो.

महावितरणाकडून सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने महापालिका त्रस्त आहे. जानेवारी महिन्यात १२ वेळी आणि फेब्रुवारी महिन्यात १२ वेळा अशी दोन महिन्यात एकूण २४ वेळा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम झाला होता. पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने सुर्या पाणी प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरळीत ठेवा अशी विनंती कऱ्णारे पत्र महापालिकेकडून सातत्याने महावितरणाला दिले जात आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त शंकर खंदारे यांनी दिली.

वीजवाहक तारा भूमिगत करण्याचा खर्च ८ कोटी

सूर्या प्रकल्पाला वीज पुरवठा करणार्?या साडेचार किलोमीटर लांबीच्या या वीजवाहक तारा आहेत. त्या जंगलातून येतात. त्यामुळे विविध नैसर्गिक आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होत राहतो. वीज पुरवठा खंडित न होता तो सुरळीत राहण्यासाठी या वीजवाहक तारा भूमिगत करणे गरजेचे आहे. त्यासाठी सुमारे ८ कोटी रुपयांचा खर्च आहे. मात्र निधीअभावी हे काम रखडले आहे.

मागील दीड दोन वर्षांंपूर्वी विजेची समस्या होती. त्यानंतर त्याची महावितरणकडून योग्य दुरुस्ती करून ही समस्या सोडविण्यात आली आहे. आता त्या ठिकाणी वीज पुरवठय़ाच्या संदर्भात कोणतीही समस्या नाही.

— विजय दुभाटे, जनसंपर्क अधिकारी महावितरण

ज्या ठिकाणाहून सूर्या प्रकल्पासाठी वीज येतो तो दरुगम भाग आहे. वीजपुरवठा खंडित होणे ही मोठी समस्या आहे. याबाबत आम्ही महावितरणला वारंवार कळवत असतो

गंगाथरन डी.,  आयुक्त वसई-विरार महापालिका

कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्याचे षडयंत्र?

सूर्या धरणात मुबलक पाणी आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप माजी महापौर रुपेश जाधव यांनी केला आहे. महावितरणने काहीही बिघाड होत नसल्याचे स्पष्ट केले आहे, तरी दोन महिन्यांत २४ वेळा पाणीपुरवठा खंडित करणं हे षडयंत्र असून बहुजन विकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी देखील असे प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 12:44 am

Web Title: electricity failure affected water supply dd 70
Next Stories
1 नाल्याच्या अर्धवट कामामुळे जिवाला धोका
2 जागाच निश्चित नाही तर वाहने उभी करायची कुठे?
3 घरच्या घरी मोत्यांची शेती
Just Now!
X