X

सहा तास वीज भारनियमन

दिवाळीच्या सुट्टय़ा व त्यापूर्वीच्या परीक्षांमुळे याचा विद्यार्थी आणि पालकांना मोठा फटका बसणार आहे.

अंबरनाथ-बदलापुरात महावितरणच्या कारभारावर नागरिकांचा संताप

राज्यभरात जाणवत असलेल्या वीज तुटवडय़ामुळे ग्रामीण भागासह आता शहरी भागातही भारनियमन केले जात आहे. यात अंबरनाथ बदलापुरातही ‘अ’ ते ‘ई’ अशा सर्वच गटांतील विभाग येत असल्याने येथे सव्वातीन तासांपासून ते सव्वासहा तासांपर्यंतचे भारनियमन करण्यात येत आहेत. मात्र गुरुवारी पहिल्यांदा केलेल्या या भारनियमनाची माहिती नसल्याने नागरिकांनी महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. त्यात दिवाळीच्या सुट्टय़ा व त्यापूर्वीच्या परीक्षांमुळे याचा विद्यार्थी आणि पालकांना मोठा फटका बसणार आहे.

राज्यभरात वाढलेला उकाडा आणि त्यामुळे विजेच्या मागणीत झपाटय़ाने झालेली वाढ पाहता राज्यभरात सध्या महावितरणातर्फे भारनियमन केले जाते आहे. मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेली दिवाळी आणि त्यापूर्वीच्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. त्यात सध्या वाढलेला उकाडा यात भर घालणार असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. हे भारनियमन करत असताना महावितरणाच्या बिल वसुलीच्या सरासरीनुसार विभागांचे गट करण्यात आले असून त्यात अंबरनाथ आणि बदलापूर तसेच दोन्ही शहरांलगतच्या ग्रामीण भागांचाही समावेश आहे. बदलापूर पश्चिमेत पाच विभाग असून त्यात अ, ब, ड आणि इ गटांचा समावेश आहे. त्यातील एरंजाड फीडर ‘अ’ गटात सव्वातीन तास, बाजारपेठेचा भाग असलेल्या ‘ब’ गटात चार तास, बदलापूर पश्चिम आणि बारवीचा भाग असलेल्या ‘ड’ गटात साडेपाच तास भारनियमन केले जाणार आहे. बदलापूर गावातील भाग हा ‘इ’ गटात असल्याने तेथे सर्वाधिक भारनियमन केले जाणार आहे. तर अंबरनाथमधीलही सर्वच भाग या भारनियमनात असून ‘अ’ ते ‘ड’पर्यंतचे विविध गट यात आहे.

गट

(सव्वातीन तास -वेळ सकाळी ७.३० ते ९.१५ व दुपारी २.४५ ते ४.१५) – बदलापूर- एरंजाड फीडर बदलापूर पश्चिम (मांजर्ली, बेलवली, हेंद्रेपाडा, मोहनानंद नगर) व बदलापूर पूर्व संपूर्ण भाग. अंबरनाथ – मोरिवली, नवरे नगर, लोक नगरी, बी केबिन रोड, आंबेडकर नगर, वडवली विभाग. उल्हासनगर – वासनशाह बाजार, दसरा मैदान, तहसील कार्यालय परिसर –

ब गट

(चार तास -वेळ १० ते १२ व दुपारी ४ ते ६) – बदलापूर – बाजारपेठ

अंबरनाथ – पूर्वेतील कानसई, साई, खेर सेक्शन, शिवगंगानगर.

पश्चिमेतील वांद्रापाडा, कोहोजगाव, वुलन चाळ, जावसई, भेंडीपाडा

उल्हासनगर- सी ब्लॉक, लाल चक्की, कुर्ला कॅम्प, मोरया नगरी, संभाजी चौक

क गट

( पाच तास – वेळ सकाळी ९.३० ते ११.४५ वव ३.३० ते ६) वांगणी

अंबरनाथ – पश्चिमेतील बुवापाडा, लादी नाका, खदान रोड, जांभूळ रोड

ड गट

(साडेपाच तास – वेळ सकाळी ८ ते १०.४५ व दुपारी ३.४५ ते ६.३०) – बदलापूर पश्चिम, बारवी उल्हासनगर- कॅम्प चार, सुभाष टेकडी, भारत नगर, मराठा सेक्शन, उल्हासनगर स्थानक परिसर.

Outbrain