02 June 2020

News Flash

मतदारांच्या गाठीभेठी, प्रभात फेऱ्यांवर भर

प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे उमेदवारांनी आता प्रचाराचा वेग वाढविला असून त्यासाठी प्रचारफेरी, पदयात्रा आणि कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले आहेत.

संग्रहित छायाचित्र

ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांची अंतिम यादी सोमवारी निश्चित झाली असली तरी राजकीय पक्षांच्या अनेक उमेदवारांनी त्याआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे उमेदवारांनी आता प्रचाराचा वेग वाढविला असून त्यासाठी प्रचारफेरी, पदयात्रा आणि कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले आहेत. याशिवाय, मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी उमेदवारांनी प्रभात फेऱ्याही सुरू केल्या आहेत.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दसऱ्यानिमित्त शहरात पथसंचलन करण्यात येते. या संचलनामध्ये केळकर हे सहभागी झाले होते. तसेच नौपाडा भागात केळकर यांनी बुधवारी प्रचारफेरी आयोजित केली होती, तर मनसेचे अविनाश जाधव यांनी अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासूनच प्रचाराला सुरुवात केली असून ३६ किमी ठाणे शहर विधानसभेचा पायी प्रवास या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे या मतदारसंघातील चुरस वाढली आहे.

तर कल्याण, डोंबिवलील चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. दसऱ्याचे निमित्ताने उमेदवारांनी घरोघरी जात आपटय़ाची पाने मतदारांना दिली.

दसऱ्यानिमित्त आयोजित संघ संचलनात मंगळवारी डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र चव्हाण, मनसेचे उमेदवार मंदार हळबे, कल्याण पश्चिमेतील बंडखोर भाजप उमेदवार नरेंद्र पवार सहभागी झाले होते.  बुधवारी सकाळी चव्हाण यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊन मागील पाच वर्षांत केलेल्या कामाची पत्रके स्वत: आणि कार्यकर्त्यांसह प्रवाशांना वाटप केली. हळबे हे व्यापारी, व्यावसायिक, जुनी संघाची मंडळी, डोंबिवली पश्चिमेतील कोकणातील रहिवाशांच्या वसाहती भागात फिरून प्रचार करीत आहेत. काँग्रेस आघाडीच्या उमेदवार राधिका गुप्ते विकासाची कोणती कामे केली याचा लेखाजोखा मांडत घरोघरी प्रचार करीत आहेत. कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील यांनी कार्यकर्त्यांचे जथ्थे घेऊन प्रत्येक गावात जाऊन भेटीगाठी सुरू केल्या आहेत. युतीचे रमेश म्हात्रे यांनीही पालिकेत राहून केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात गणपत गायकवाड, धनंजय बोडारे यांच्यात स्थानिक उमेदवार पाहिजे की परका अशा प्रकारे प्रचार केला जात आहे. मनसेचे प्रमोद पाटील यांनी भव्य प्रचार कार्यालय प्रीमिअर कंपनीसमोरील मैदानावर थाटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 2:13 am

Web Title: emphasis voter turnout dawn rounds akp 94
Next Stories
1 चिंचवली गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण
2 मातब्बर..तरीही अल्पशिक्षित
3 ठाणे जिल्ह्य़ात पोलीसही सतर्क
Just Now!
X