News Flash

आदिवासी मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर

साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात ८५ ग्रामपंचायती असून येथे एक लाख मजुंराची नोंद आहे.

डहाणूत ‘रोजगार हमी योजना’ अपयशी
‘मागेल त्याला त्याच्याच गावात काम’ असा नारा राज्य आणि केंद्र सरकार देत असले तरी आदिवासीबहुल डहाणू तालुक्यातील आदिवासी मात्र सध्या रोजगारासाठी स्थलांतर करीत आहेत. भाताची कापणी संपल्यामुळे या परिसरातील हजारो मजूर बेरोजगार झाले असून त्यांनी काम शोधण्यासाठी शहरांकडे स्थलांतर सुरू केले आहे. ‘रोजगार हमी योजना’नाही त्यांना काम देण्यास अपयशी ठरली आहे.
साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात ८५ ग्रामपंचायती असून येथे एक लाख मजुंराची नोंद आहे. साधारणत: जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यांपासून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. मधल्या काळात म्हणजेच दिवाळीनंतर हाताला कामे नसल्याने या भागातील आदिवासी मजुरांना पोराबाळांसह कामाच्या शोधात ठाणे, मुंबई, भिवंडी, वसई, पालघर तसेच गुजरात राज्याच्या उमरगाव, संजाण, भिलाड येथे स्थलांतर करावे लागते. येथील आदिवासी टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी व मुलाबाळांचे संगोपन करण्यासाठी दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर रोजगारासाठी वीटभट्टी तसेच इमारत बांधकाम व्यावसायिकांकडे धाव घेत असतात.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या या कुटुंबांना रोजगारासाठी स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय नाही. पावसाळ्याच्या दिवसांत रानभाज्या विकून आणि शेतात मजुरीवर काबाडकष्ट करून मुलाबाळांचे संगोपन करून ते उदरनिर्वाह करीत असतात. २००७-२००८पासून महाराष्ट्रात ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेच्या मागे शासनाचा मूळ उद्देश ग्रामीण व दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना गावातल्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणे, रोजगाराकरिता शहराकडे होणारे स्थलांतर थांबविणे, हा होता, परंतु प्रशासनाला त्यात अपयश आले असून या आदिवासी बांधवांना कामासाठी अन्य शहरात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 2:33 am

Web Title: employment guarantee scheme fall in virar
Next Stories
1 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांना ‘आचारसंहिता’
2 वनराई बंधाऱ्यातून पाणीसाठय़ाचा नवा आदर्श
3 ‘सलग दोन दिवस पाणी बंद नको’
Just Now!
X