तरुणांकडून भाजीविक्रीपासून ऑनलाइन प्रशिक्षण वर्गापर्यंत व्यवसाय; विपणनासाठी समाजमाध्यमांची मदत

आशीष धनगर, लोकसत्ता

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

ठाणे : करोनाच्या संकटामुळे बाजारात निर्माण झालेली मंदी, नोकऱ्यांमधील कपात अशा विविध कारणांमुळे चिंता व्यक्त होत असली तरी काही महाविद्यालयीन तरुणांनी या मंदीचे रूपांतर संधीत करून व्यवसाय सुरू केले आहे. टाळेबंदीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत भाजीपाला, केकविक्री, घरगुती खानावळ, ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग अशा छोटय़ा व्यवसायांच्या माध्यमातून हे तरुण अर्थार्जन करत आहेत.

टाळेबंदीच्या काळात ठाणे आणि डोंबिवलीतील काही तरुणांना व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. ठाण्यातील वर्तकनगर परिसरात राहणारी प्रियंका पाटोळे यापैकीच एक. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात नागरिकांना भाजीपाला मिळवण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रियंकाने एप्रिलपासून नागरिकांना थेट भाजीपाला पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. नाशिक आणि पुण्यातील काही शेतक ऱ्यांकडून भाजीपाला घेऊन ती आपल्या परिसरात विक्री करते. यातून चांगला नफा मिळत असल्याने हा व्यवसाय यापुढेही सुरूच ठेवण्याचा मानस तिने व्यक्त केला.

ठाण्यात राहणारा ऋषी जयस्वाल हा मुलुंडच्या एमसीसी महाविद्यालयात शिकतो. ऋषीला जेवण बनवायची आवड आहे. टाळेबंदी सुरू झाल्याने शहरातील सर्वच रेस्टॉरंट आणि हॉटेल बंद असल्याने खवय्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याची ही नामी संधी असल्याते ऋषीने ओळखले. त्याने त्याच्या काही मित्रांसोबत होम किचन सुरू करण्याचे ठरवले. त्याने बनवलेल्या जेवणाच्या जाहिराती करण्यास सुरुवात केली. बघताबघता ऋषीला शाकाहारी-मांसाहारी जेवणाच्या दररोज मागणी येऊ लागली. ऋषीला ठाण्यातील घोडबंदरपासून मुलुंडपर्यंतच्या नागरिकांच्या जेवणाच्या दररोज तीन ते चार ऑर्डर येतात. त्यातून ऋषी दररोज दोन ते तीन हजारांची कमाई करतो आहे. डोंबिवली हिमानी पाटील हिने टाळेबंदीच्या कालावधीचा वापर तिच्या केक बनविण्याच्या कलेची जाहिरात करण्यासाठी वापरला. हिमानीने समाजमाध्यमांवर पेज तयार करून केकच्या आकर्षक जाहिराती केल्या. त्यामुळे टाळेबंदीत केकची दुकाने बंद असल्याने अनेक ग्राहकांनी या पेजच्या माध्यमातून वाढदिवस साजरे करण्यासाठी केक बनविण्याच्या ऑर्डर हिमानीला देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हिमानीला दररोज तीन ते चार केक बनविण्याच्या आर्डर येत असून त्यातून हिमानीला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे ती सांगते. निकिता रावळ ही ठाण्यातील घोडबंदर भागात राहते. ‘कॅलिग्राफी’ची आवड असणाऱ्या निकिताने टाळेबंदीच्या काळात ‘गुगल मीट’च्या साहाय्याने घरी असणाऱ्या काही विद्यार्थ्यांसाठी कॅलिग्राफीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या प्रशिक्षणासाठी निकिता काही शुल्क आकारते. त्यातून तिला चांगले पैसै मिळत आहेत.