शंभरहून अधिक गुंडांचा एनकाऊंटरमध्ये खात्मा करणारे चकमकफेम प्रदीप शर्मा यांची ठाणे गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारला. शर्मा यांनी प्रोटोकॉलनुसार काल ठाणे पोलीस आयुक्तालयात जाऊन तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी नियुक्तीपत्राचा अर्ज भरला होता, अशी माहिती आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

प्रदीप शर्मा यांना नऊ वर्षांपूर्वी पोलीस दलातून निलंबित केले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तसेच बनावट चकमक प्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. शर्मा यांचा जवळपास ३१२ चकमकींमध्ये सहभाग होता. त्यांनी शंभरहून अधिक गुंडांचा खात्मा केला आहे. त्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे. दाऊदसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ‘डी’ कंपनीच्या इशाऱ्यावर ते काम करत होते, असाही आरोप होता. नोव्हेंबर २००६ मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील १३ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्माही होते. २०१३ मध्ये मुंबईतील न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले होते.

After the suspension Vice-Chancellor Dr Subhash Chaudhary took charge of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
नागपूर: निलंबनानंतर कुलगुरू डॉ. चौधरींनी पदभार स्वीकारला
tejaswi yadav on narendra modi
NDA मध्ये पंतप्रधान मोदीच नेते, बाकी त्यांचे अनुयायी; तेजस्वी यादवांची टीका
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती का महत्त्वाची?