मासुंदा तलावाच्या काठावर आयोजन; मराठी-हिंदी गाण्यांवर ठाणेकर थिरकले

ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या मासुंदा तलावाच्या काठावर ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी गाण्यांवर ठाणेकर थिरकले. यावेळी विविध प्रश्नांची उत्तरे देत ठाणेकरांनी बक्षिसे जिंकली.

दरवर्षी ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे ‘लोकसत्ता’तर्फे आयोजन करण्यात येते. यंदाही हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला असून येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. २५ जानेवारीपासून सुरू झालेल्या या फेस्टिव्हलला ठाणेकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाचा एक भाग म्हणून शनिवारी आणि रविवारी सायंकाळी मासुंदा तलावाच्या काठावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी या कार्यक्रमाची सुरुवात वाद्यवृंदानी ‘ए शाम मस्तानी., ‘समा है सुहाना सुहाना’ ही गाणी वाजवून केली. गायिका सायली कांबळी, गायक दिलीप गोलपकर आणि अमित राजे यांनी विविध मराठी आणि हिंदी गाणी सादर केली. त्यामध्ये ‘ही गुलाबी हवा वेड लावी जीवा’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘हिची चाल तुरु तुरु’, ‘मला वेड लागले प्रेमाचे’, ‘अश्विनी येना’ यांसह इतर कोळीगीते तर ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी’, ‘आवोना-गले लग जाओना’, ‘चला जाता हू किसी के धून’, ‘जाने जा धुंडता फिर रहा’ या हिंदी गीतांचाही यात समावेश होता. तसेच ॠग्वेद बेंद्रे आणि समूहाने लावणी, पाश्चिमात्य नृत्याविष्कार यावेळी सादर केले.

रविवारी सायंकाळीही हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती. यावेळी दत्तात्रय मेस्त्री आणि गायिका अपर्णा नागरगट्टी यांनी गायलेल्या ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर,’ ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’, ‘बदन पे सितारे लपेटे हुँए’ या गाण्यांवर अनेकांचे पाय थिरकले. तर, ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’, ‘फुलले रे क्षण माझे फुलले रे’ या गाण्यांचा ठाणेकरांनी आनंद लुटला. कार्यक्रमाचा शेवट ऋग्वेद बेंद्रे आणि समूहाच्या झिंगाट गाण्यावरील नृत्याविष्काराने झाली. या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान ठाणे शहराशी निगडीत विविध प्रश्न उपस्थितांना विचारले. या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

प्रायोजक

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा  रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. तन्वी, ऑर्बिट, टिप टॉप मिठाईवाला, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स हे या महोत्सवाचे असोसीएट पार्टनर आहेत. तर बंधन टुरिझम हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. रतांशी खेराज सारीज, जीन्स जंक्शन, द रेमंड शॉप, शुभकन्या, अशोक स्वीट्स, दैनिक मालवणी, अनंत हलवाई, मॅपल्स सलून आणि स्पा हे या महोत्सवाचे पॉवर्ड बाय प्रायोजक असून डिजी ठाणे हे महोत्सवाचे डिजीटल पार्टनर आहेत. या महोत्सवाचे खवय्ये रेस्टॉरंन्ट हे फूड पार्टनर, पंरपंरा हे स्टायलिंग पार्टनर, वोरटेक्स हे वायफाय पार्टनर, डय़ुरेन फर्निचर हे कम्र्फट पार्टनर, गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस हे होम अ‍ॅप्लायन्सेस पार्टनर, रिट्झ बँक्वेट्स हे बँक्वेट पार्टनर आणि सरलाज् हे ब्युटी पार्टनर आहेत. तर कलानिधी हे या महोत्सवाचे गिफ्ट पार्टनर आहेत.

कसे सहभागी व्हाल?

* पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झालेल्या दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बक्षिसांची संधी मिळू शकेल.

* सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देयक दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.

* ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

* अर्धवट माहिती भरलेली कूपन फेटाळले जातील.

* ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’ मधून प्रसिद्ध केले जाईल.

* या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.