ठाणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून स्पष्ट

ठाणे : सण, उत्सव तसेच विविध कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ध्वनिक्षेपकांमुळे शहराच्या विविध भागांसह शांतता क्षेत्रांमध्येही ‘गोंगाट’ होत असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने शहराच्या विविध भागांतील ध्वनीच्या पातळीचे २४ तास मापन करून त्याआधारे ही निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यानुसार शांतता क्षेत्रातील आवाजाची मर्यादा दुप्पटीने वाढल्याचेही समोर आले आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

सण-उत्सव तसेच विविध कार्यक्रमांमध्ये मोठय़ा आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यात येतात. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. याशिवाय, वाहनांच्या इंजिनचा आवाज, कर्णकर्कश हॉर्न, बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रातील यंत्रांचा आवाज यामुळेही ध्वनी प्रदूषण होते. या प्रदूषणाचा परिणाम प्राणी, वनस्पती तसेच मानवी आरोग्यावर होतो. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनी पातळीची मर्यादा ठरवून दिली आहे. ध्वनीची पातळी त्याप्रमाणे आहे की नाही, याची पाहाणी पालिकेकडून करण्यात येते.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने शहरातील ३८ ठिकाणी २४ तास ध्वनीची पातळी मोजली. त्यामध्ये रेल्वे स्थानक, राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग, मोठे रस्ते, छोटे रस्ते, औद्योगिक क्षेत्र, व्यावासयिक क्षेत्र, निवासी क्षेत्र आणि शांतता क्षेत्र अशा ३८ ठिकाणांचा समावेश आहे. या सर्वच ठिकाणी पातळी मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. तर शांतता क्षेत्रातील आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा दुप्पट असल्याचे समोर आले आहे.

शांतता क्षेत्रातील गोंगाटाची ठिकाणे

ज्ञानसाधना महाविद्यालय, वागळे इस्टेटमधील कामगार रुग्णालय, सावरकरनगरमधील इंदीरा गांधी विद्यालय, ज्ञानोदय विद्यामंदिर, सिंघानिया स्कूल, ज्यूपिटर रुग्णालय, वर्तकनगरमधील लिटिल फ्लॉवर स्कूल, पोखरणमधील बेथनी हॉस्पिटल, वसंतविहार स्कूल, डी.ए.व्ही पब्लिक स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल, ओवळा येथील वेदांत रुग्णालय, कावेसरमधील न्यू हॉरिझन स्कूल, हिरानंदानी स्कूल, माजिवाडा ग्रामीण शिक्षण स्कूल, उथळसर भागातील जिल्हा शासकीय रुग्णालय, जांभळी नाका येथील सेंट जॉन बाप्टिस्ट हायस्कूल, नौपाडय़ातील एम.एच. मराठी हायस्कूल, जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे न्यायालय अशा शांतता क्षेत्रांत आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असल्याची निरीक्षणे पर्यावरण अहवालात नोंदविण्यात आली आहेत. गणेशोत्सवापूर्वी आवाजाची पातळी मोजून ही निरीक्षण नोंदविण्यात आली आहेत.

ध्वनी मर्यादा

क्षेत्र               मर्यादा (डेसिबल)

                    दिवसा  रात्री

औद्योगिक      ७५     ७०

व्यावसायिक     ६५     ६५

निवासी             ५५     ४५

शांतता              ५०     ४०

ध्वनी तीव्रता अहवाल

वर्गवारी                  कामाचे दिवस          सुट्टीचे दिवस

दिवसा         रात्री           दिवसा         रात्री

रेल्वे                     ८८                ७९              ८९            ७९

महामार्ग              ८६                 ७९              ८६            ६४

द्रुतगती मार्ग        ८३                 ७४               ७९            ७५

मोठे रस्ते              ८३               ७८                ८१            ७५

छोटे रस्ते              ७६            ६४                  ७९            ६४

औद्योगिक           ८२            ७८                 ८२            ७७

व्यावसायिक         ८५            ७६                 ८३            ७८

रहिवाशी                ८०            ७५                 ७८            ७६

शांतता                   ८१            ७३                  ८२            ७८