सिलिंडरच्या स्फोटाच्या माहितीसाठी चौकशी समिती स्थापन

भाईंदर : मीरा रोड येथील शांती गार्डन परीसरात ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मोकळ्या मैदानात ठेवलेल्या तब्बल सहा सिलिंडरचा भव्य स्फोट झाल्याची घटना घडली. त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली असून  घटनेची माहिती  घेण्याकरिता चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

मीरा रोड येथील शांती गार्डन परिसरात मोकळ्या जागेत खासगी एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेले दोन ट्रक व एक टेम्पो कोणत्याही सुरक्षिततेची उपाययोजना न करताच उभे  करण्यात आले होते.  ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास त्यातील र्सिंलडरचे स्फोट झाल्याची घटना घडली.या स्फोटात जीवितहानी झाली नसली तरी त्या स्फोटांच्या तीव्रतेने तेथील लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे.

या घटनेच्या  चौकशीसाठी पालिकेने अतिरीक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समिती सदस्यांमध्ये पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक खांबित, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे, परवाना विभागाचे प्रमुख अविनाश जाधव, मुख्य सव्र्हेअर सुनील म्हात्रे व प्रभाग समिती क्रमांक ६ चे प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत यांचा समावेश आहे.

ठराव करूनही कारवाई नाही

मीरा-भाईंदर शहरात मोकळ्या मैदानात, बाजारात आणि दुकानाबाहेरील परीसरात सर्रासपणे सिलेंडरचा वापर करून खाद्य विक्रीचा व्यवसाय करण्यात येतो.अश्या व्यवसायांमुळे जीवित हानी होण्याचा धोका असल्याने  यांवर बंदी घालण्याचा  ठराव तीन वर्षांपूर्वी महासभेत ठराव मंजूर करण्यात आला होता.मात्र त्यानंतर देखील पालिका प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली नसल्यामुळे हा धोका कायम असल्याचे  आरोप सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

रस्त्यावर खाद्यपदार्थ आणि फुगे विकण्याकरिता सिलेंडरचा वापर करण्यात येतो. मात्र हे अनधिकृत असताना ही देखील यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. आता इतकी मोठी घटना घडल्यानंतरदेखील प्रशासनाने गंभीर लक्ष द्यावे अशी मागणी मी समिती अध्यक्षांकडे केली आहे  – प्रशांत दळवी, सभागृह नेता,  मीरा-भाईंदर महानगरपालिका

 

फेब्रुवारी रोजा झालेल्या स्फोटाचा तपास करण्याकरिता समिती नेमण्यात आली आहे. या संदर्भात बैठका घेण्यात येत असून लवकरच योग्य पावले उचलण्यात येतील.  -दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त