News Flash

संमेलनासाठी परीक्षांचे वेळापत्रक बदलणार?

महाविद्यालयीन तरुण तसेच शाळकरी मुले यांच्यामध्ये साहित्याविषयी उदासिनता आढळून येते.

तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी संयोजकांचा प्रयत्न

साहित्य संमेलनामध्ये तरुणांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, यासाठी विविध प्रयत्न केले जात असले तरी वार्षिक परीक्षा तोंडावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे संमेलनादरम्यान येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ९०वे अखिल भारतीय साहित्य संमेलन येत्या फेब्रुवारी महिन्यात डोंबिवलीत होत आहे. याच काळात बारावीच्या परीक्षा असतात. महिनाभराच्या अंतराने दहावीच्या परीक्षा असतात. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन परीक्षांही याचकाळात होतात. १ फेब्रुवारीपासून तोंडी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहेत. संमेलनासाठी त्या परीक्षांचे वेळापत्रक बदलावे, अशी सूचना शुक्रवारी एका बैठकीत प्राध्यापक आणि संमेलन संयोजकांनी केली. शिक्षण मंडळाला याविषयीचे निवेदन लवकरच पाठविण्यात येणार आहे.

‘महाविद्यालयीन तरुण तसेच शाळकरी मुले यांच्यामध्ये साहित्याविषयी उदासिनता आढळून येते. मात्र डोंबिवलीतील साहित्य संमेलन त्याला अपवाद ठरावे, या संमेलनामध्ये १५ ते २५ वयोगटातील तरुणांचा अधिक सहभाग व्हावा म्हणून प्राध्यापकांनी प्रयत्न करावे. डोंबिवली हे शहर सांस्कृतिक शहर असून शिक्षणाचे माहेरघरही आहे. त्यादृष्टीने यंदाच्या संमेलनात साहित्याविषयीचा ओढा तरुणांमध्ये वाढविण्यासाठी प्रयत्न करू,असे मत माजी प्र-कुलगुरू व बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेशचंद्र यांनी डोंबिवलीमध्ये मांडले.

९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली शहरात होत असून या संमेलनामध्ये तरुण पिढीचा जास्तीत जास्त सहभाग असावा यासाठी काय प्रयत्न करता येतील याविषयी विचारविनिमय करण्यासाठी संयोजन समिती आगरी युथ फोरमच्या वतीने विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कल्याण, डोंबिवली, गोवेली, शहापूर आदी परिसरातील महाविद्यालयांचे प्राचार्य सहभागी झाले होते. या वेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. अशोक महाजन, मीनाक्षी ब्रrो, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, रविप्रकाश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना डॉ. नरेशचंद्र यांनी वरील मत व्यक्त केले.

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या आधी साहित्य संमेलन झाल्यास शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल. मात्र १ फेब्रुवारीपासूनच प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांचा कितपत सहभाग असेल अशी शंका प्राध्यापकांनी व्यक्त केली. यावर शिक्षण मंडळाला प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांच्या वेळापत्रकात वा तारखांमध्ये बदल करण्याविषयीचे निवेदन मंडळाला पाठविण्याचा विचार सुरू असल्याचे प्रा. डॉ. अशोक महाजन वआगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 2:31 am

Web Title: exam schedule may change for 90 akhil bharatiya marathi sahitya sammelan
Next Stories
1 ‘आयसिस’मध्ये गेलेला कल्याणचा तरुण ठार
2 सवरा यांना धक्का!
3 शहरबात बदलापूर : धडक कारवाईचे स्वागत;  पण.. ?
Just Now!
X