शांत आणि थंड पाण्याचा तलाव, काळ्या पाषाणांनी बांधलेला तलावाचा काठ, काठावरच्या उद्यानामध्ये वाढलेली मोठी वृक्षसंपदा, त्यामध्ये हिरवळीचे तुकडे, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य तर दुसरीकडे मोठय़ांसाठी ध्यानकेंद्र..चालण्यासाठी गोलाकार ट्रॅक हे सगळे वर्णन ठाण्यातील उथळसर परिसरातील घोसाळे तलावाचे आहे. वर्षांच्या बाराही महिने हा परिसर नागरिकांनी गजबजलेला असतो. मनोरंजन, पर्यटन आणि व्यायाम करणाऱ्यांचा येथे सदैव राबता असतो. गेली अनेक वर्षे या भागात नागरिक व्यायामासाठी येत असून त्यांच्यासाठी व्यायामाबरोबरच एक चांगला मनोरंजन कट्टा म्हणून विकसित झाला आहे. त्यामुळे या परिसराला अधिकाधिक देखणे स्वरूप देण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज येथे येणाऱ्या प्रत्येक रहिवाशाला वाटत असते.

तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाण्यातील अनेक तलाव काळाच्या ओघात नष्ट झाले आहे. त्यातील काही तलाव आजही आपले अस्तित्व राखून असून महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सुविधांमुळे हे तलाव रहिवाशांचे लक्ष वेधत आहेत. या तलावांमध्ये आंबे-घोसाळे तलावाचा समावेश केला जातो. खरे तर उथळसर येथे अंबे आणि घोसाळे असे दोन तलाव होते. मात्र त्यापैकी घोसाळे तलाव मात्र शाबूत राहिला तर अंबे तलावावर अतिक्रमणाचा विळखा बसला. कालांतराने तो तलाव नष्ट झाला. मात्र त्यामुळे इथे अस्तित्वात असणाऱ्या घोसाळे तलावाला लोक आंबे-घोसाळे तलाव म्हणून ओळखू लागले. महापालिका प्रशासन अंबे तलावाचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न करत असले तरी सध्या घोसाळे तलाव मात्र येथील रहिवाशांचे पुरते मनोरंजन आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद देण्याचा प्रयत्न करत आहे.
घोसाळे तलावाचे सुशोभीकरण..
महापालिकेच्या वतीने घोसाळे तलावाची डागडुजी, रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाचे काम करण्याचे काम सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागातील सुशोभीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांना काही अंशी अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. तलावाभोवती वृक्ष लागवड, विद्युत व्यवस्था, सुशोभीकरण आणि तलावाची रंगरंगोटी या कामांचा त्यात समावेश आहे. तलावाच्या मध्यभागी संगीत कारंजे तयार करण्याचे आदेशही येथील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. काही कामे पूर्णत्वास आली असून काही कामे अद्यापही बाकी आहेत.
तलावाची दुरवस्था..
ठाण्यातील चांगल्या स्थितीमधील तलावांमध्ये घोसाळे तलावाची गणणा होत असली तरी तेथील परिस्थिती मात्र तलावासाठी प्रतिकूल आहे. दारूच्या बाटल्या, घनकचरा आणि पावाचे तुकडे पाण्यात टाकणाऱ्यांची संख्या या भागात मोठी आहे. तलावाच्या मध्यावर तयार करण्यात आलेल्या रंगीत संगीत कारंज्यांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने ते अत्यंत तुटलेल्या अवस्थेत आढळून येते. मुलांसाठी उपलब्ध खेळण्यांची अवस्था अत्यंत नाजूक आहे, तर नागरिकांना बसण्यासाठीही पुरेशी व्यवस्था नाही. अनेक बेंचेस तुटलेल्या अवस्थेत आहेत. या भागात अनेक ठिकाणी जमीन उंचसखल असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतो, असा भाग सपाट करण्याची गरजही अनेकांकडून व्यक्त केली जाता आहे.

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

महिलांचा ओम योग ग्रुप..
ठाण्यातील उथळसर, कोलबाड, चरई, आंबेडकर रोड, खोपट परिसरातील महिलांचा समावेश असलेला ओम योगा ग्रुप या तलावाच्या काठी गेल्या सात ते आठ वर्षांपासून एकत्र येतो. नको औषध नको गोळ्या, हसता हसता आजार टाळा, अशा घोषणा देत या महिला इथे व्यायाम करतात. योग, हास्य योग, टाळ्यांचा व्यायाम अशा माध्यमातून या महिला इथे आपला आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न करतात. सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ थांबून महिलांच्या एकमेकींमधील कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतात. संपदा कुलकर्णी, कल्पना निमकर, विद्या कर्विरकर, मीना कदम, उशा शेट्टी, रंजना सावंत यांच्यासह अनेक महिला या तलावाच्या काठी व्यायाम करतात.

अपेक्षा..
तरुणांना आकर्षित करेल अशी दर्जेदार गाणी हवीत..
आंबे-घोसाळे तलावाच्या काठावर आता बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या असून तलावाच्या बाजूला संगीत लावण्यात येते. यावर अत्यंत जुनी आणि तरुणांनी कधीही न ऐकलेली गाणी वाजवली जात असल्याने या भागात तरुणांना कंटाळा येत असतो. मराठीमधील अत्यंत दर्जेदार गाणी किंवावाद्यांच्या धून वाजवल्यास या भागात आल्हादायक वातावरण निर्माण होऊ शकेल. तसेच अशा गाण्यांचे वादन ठरावीक वेळात झाल्यास तरुणांचा ओढा वाढू शकेल.
-ओमकार माळकर, ठाणे.

खेळण्यासाठी नेट असायला हवी..
तलावाच्या काठावर येणारे ५० टक्क्य़ाहून अधिक रहिवासी हे ज्येष्ठ नागरिक असले तरी तरुणांची संख्यासुद्धा बरीच असते. प्रामुख्याने खेळण्यासाठी इथे तरुण मंडळी येत असतात. या भागात अनेक ठिकाणी मोकळी जागा असून त्या भागात बॅडमिंटन खेळण्यासाठी नेटची व्यवस्था केल्यास त्याचा तरुणांना फायदा होऊ शकेल. तसेच मॉर्निग स्पॉटच्या परिसरात जास्तीत जास्त खेळाचे वातावरण निर्माण केल्यास तरुणांना या भागामध्ये येण्यास प्रेरणा मिळू शकेल.
-कामना चक्रवर्ती, ठाणे

अधिक हिरवळ हवी..
तलावाच्या काठावर आता सुशोभीकरणाचे काम सुरू असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. या भागामध्ये गवताची हिरवळ संपूर्ण काठावरील जागेत लावण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यास फायदा होऊन उन्हाचा त्रासही टाळता येऊ शकेल. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करण्याबरोबरच तेथे २४ तास पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. पावसाळ्यामध्ये व्यायाम करण्यासाठी अडचण येत असते. अशा वेळी काही ठिकाणी छताची व्यवस्था केल्यास नागरिक त्याचा लाभ घेऊ शकतील.
-संपदा कुलकर्णी, ठाण 

खुली व्यायाम शाळा असणे गरजेचे..
सुशोभीकरण करताना काही अनावश्यक गोष्टी उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अत्यंत कोंदट आणि छोटय़ा ध्यानधारणा केंद्राचा समावेश आहे.त्याऐवजी उद्यानामध्ये खुली व्यायाम शाळा उभारण्याची सर्वात अधिक गरज होती. परिसरातील मुलांना खेळण्यासाठी उभारण्यात आलेल्या खेळणी तुटलेली आहे. बेंचेसची अवस्थाही फारशी चांगली नाही, -विशांत गायकवाड, ठाणे

तलावाच्या पाण्याची स्वच्छता हवी..
तलावाच्या पाण्याची अवस्था अत्यंत वाईट होऊ लागली असून तलावाच्या पाण्यात माणसांकडून केले जाणारे प्रदूषण थांबवण्याची गरज आहे. अनेक मंडळी या तलावामध्ये माशांसाठी पाव टाकताना दिसतात हे अत्यंत चुकीचे आहे. तसेच अनेकांकडून या तलावात दारूच्या रिकाम्या बॉटल फेकलेल्या दिसतात. या गोष्टी थांबण्याची गरज आहे.
-मीना कदम