विनाशुल्क रुग्ण तपासणी करणार
प्रभावी रुग्णसेवेऐवजी आपल्या ढिसाळ कारभारामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता ठाण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची विनामूल्य सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मान्यतेने अशा खासगी तज्ज्ञ डॉक्टरांचे स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारीही सुरू झाली असून त्यासाठी नामवंत वैद्यकतज्ज्ञांशी संपर्क साधला जात आहे.
कळवा रुग्णालयात ५०० खाटांची सुविधा उपलब्ध असून दररोज पाचशेच्या आसपास रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात उपचारासाठी येतात. या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे रुग्णालय राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयास संलग्न असल्यामुळे तिथे अनेक विषयांतील वैद्यकीय तज्ज्ञांची सेवाही उपलब्ध आहे. रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यासाठी महापालिकेला दरवर्षी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. त्यापैकी रुग्णालयासाठी ७० कोटी, तर महाविद्यालयासाठी ३३ कोटी रुपये खर्च होतात. असे असतानाही या रुग्णालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे रुग्णांना अपेक्षित अशी आरोग्य सेवा मिळतच नाही. अनेकदा रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याऐवजी मुंबईतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याने कळवा रुग्णालयाचा कारभार वादात सापडला आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने एक विशेष उपक्रम हाती घेतला असून शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांना कळवा रुग्णालयातील कारभारात सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
सत्ताधारी शिवसेनेच्या संकल्पनेतून यासंबंधीचा प्रस्ताव पुढे आला आहे. ठाण्यात खासगी सेवा पुरविणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या मोठी आहे. विविध क्षेत्रांत नामवंत अशा ठाणेकर डॉक्टरांच्या सेवेचा कळवा रुग्णालयातील रुग्णांना लाभ मिळावा यासाठी या प्रस्तावाची आखणी करण्यात आली.
ठाण्यातील काही प्रसिद्ध डॉक्टरांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांनी पत्रकारांना दिली. आयुक्त जयस्वाल यांनी यापैकी काही डॉक्टरांना नियुक्तीपत्रक दिले आहे. ठाण्यातील प्रसिद्ध वैद्यकीयतज्ज्ञ डॉ. गाडगीळ यांनी या उपक्रमात सहभागी होण्यास सर्वप्रथम मान्यता दिली. अशा तज्ज्ञांचे पॅनल तयार करण्याचा प्रस्ताव असून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
Calcutta High Court
संदेशखालीतील प्रकरण अत्यंत लाजिरवाणे; कलकत्ता उच्च न्यायालयाचे ताशेरे
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज
Violation of Model Code of Conduct by Municipal Commissioner Vipin Paliwal
मनपा आयुक्तांकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन, निलंबनासह फौजदारी…