News Flash

अश्लील चित्रफीत बनवून खंडणीची मागणी

तरुणाला व्हिडीओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून त्याच्याकडून खंडणी मागितल्याचा प्रकार नालासोपारा येथे उघडकीस आला आहे.

संग्रहीत

दिल्लीच्या तरुणीवर गुन्हा दाखल

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : तरुणाला व्हिडीओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून त्याच्याकडून खंडणी मागितल्याचा प्रकार नालासोपारा येथे उघडकीस आला आहे. या तरुणाने खंडणी न दिल्याने त्याची चित्रफीत प्रसारित करण्यात आली. या प्रकरणी दिल्ली येथील तरुणीवर तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तरुण २४ वर्षांचा असून तो नालासोपारा येथे राहणारा आहे. त्याची दिल्ली येथील नेहा शर्मा नावाच्या तरुणीशी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ या समाजमाध्यमाद्वारे बोलू लागले होते. या वेळी आरोपी नेहाने फिर्यादी तरुणाला व्हिडीओ कॉलवर अश्लील कृत्य (सेक्स चॅट) करण्यास सांगितले. तिच्या आग्रहामुळे फिर्यादी तरुण तिच्याशी व्हिडाओ कॉलवर अश्लील कृत्य करत होता. मात्र या चित्रफितीच्या आधारे तरुणीने फिर्यादी तरुणाकडे पाच हजारांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. फिर्यादीने तिच्या धमकीला दाद न दिल्याने आरोपी तरुणीने या चित्रफिती तरुणाच्या मित्रांना पाठवून त्याची बदनामी केली.

हा प्रकार समजताच त्याने तुळिंज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आरोपी तरुणी हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 2:20 am

Web Title: extortion case adult film dd 70
Next Stories
1 कातकरी पाडा तहानला
2 करोना कराल : पालिका पास की नापास? वसई-विरार पालिका – अवघ्या १९ कोटींत चार हात
3 कल्याण-डोंबिवलीत कठोर निर्बंध
Just Now!
X