21 September 2020

News Flash

नवीन गवळीवर खंडणीचा गुन्हा

कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका भागातील एक विकासक आपल्याकडून इमारतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करीत नाही याचा राग येऊन या भागातील शिवसेनेचा माजी नगरसेवक नवीन

| April 23, 2015 12:03 pm

कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका भागातील एक विकासक आपल्याकडून इमारतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करीत नाही याचा राग येऊन या भागातील शिवसेनेचा माजी नगरसेवक नवीन गवळी याने विकासकाच्या कार्यालयात २५ जणांसह घुसून प्रचंड तोडफोड केली. आपल्याकडून इमारतीचे साहित्य खरेदी केले नाही तर दहा कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल असे धमकावले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. गवळी फरार झाला आहे.
नवीन गवळी हे परिवहन समितीचे माजी सभापती होते. पाच वर्षांपूर्वी पालिकेतील शिवसेनेचे तरुण नगरसेवक म्हणून ते ओळखले जात होते. कल्याण पूर्वमधील चक्कीनाका भागात विकासक युसुफ झोजवाला यांचे इमारत उभारणीचे काम सुरू आहे.
या कामासाठी झोजवाला यांनी आपल्याकडून रेती, खडी व इतर बांधकामाचे साहित्य घ्यावे म्हणून आग्रह करण्यासाठी नवीन गवळी आपल्या २५ पंटरांसह झोजवाला यांच्या चक्कीनाका येथील कार्यालयात घुसला. झोजवाला यांनी आपण तुमच्याकडून साहित्य खरेदी करणार नाही, असे सांगितले. त्या वेळी संतप्त झालेल्या गवळीने झोजवाला यांच्याकडे त्या बदल्यात दहा कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. ती न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार युसुफ झोजवाला यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. झोजवाला दाद देत नाहीत म्हणून गवळी व त्यांच्या समर्थकांनी विकासकाच्या कार्यालयाची तोडफोड करून तेथील सीसीटीव्ही चोरून नेल्याचा आरोप आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 12:03 pm

Web Title: extortion offense on naveen gawli
टॅग Extortion
Next Stories
1 बोईसरमधील १३ हेक्टर जागेतील अतिक्रमणांवर हातोडा
2 वाहतूक पोलिसांकडून मध्यरात्री वाहनचालकांची कोंडी
3 गुन्हेवृत्त : ठाण्यात सोनसाखळी चोरी
Just Now!
X