अनेक घरांमध्ये आवडीने पाळीव प्राणी ठेवले जात असले तरी प्राणी पाळण्यामागचा प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो. एकटेपणा दूर करण्यासाठी मुक्या प्राण्यांची सोबत काहीजण स्वीकारतात. काहींना पाळीव प्राणी ठेवणे प्रतिष्ठेचे वाटते. आपुलकीपोटीही प्राणी पाळले जातात. घराची सुरक्षितता अथवा राखण या उद्देशानेही श्वान पाळले जातात. काही मालक श्वान निवडताना त्या श्वानाची शारीरिक ठेवण, सौंदर्य या गोष्टींचा गांभीर्याने विचार करतात. त्याचप्रमाणे काहीजण श्वानांच्या सौंदर्यापेक्षा त्यांच्यातील घराचे रक्षण करण्याची क्षमता, शत्रूवर आक्रमण करण्याचा आत्मविश्वास या गुणांना महत्त्व देतात. शोभेसाठी पाळले जाणारे श्वान आणि घराचे रक्षण करण्याच्या उद्देशाने घरात बाळगलेले श्वान यात फरक आढळतो. आपल्या विशिष्ट क्षमतेसाठी काही श्वान ओळखले जातात. त्यापैकीच एक म्हणजे इंग्लिश बुल डॉग. ज्यांना ब्रिटिश डॉग असेही म्हणतात. नावाप्रमाणेच मूळचे इंग्लंडमधील असलेल्या या श्वानांना इंग्लंडमध्ये नॅशनल डॉग म्हणून ओळखले जाते. इंग्लंडमध्ये १६३० पासून या श्वानांचे संदर्भ आढळतात. पूर्वीच्या काळी इंग्लंडमध्ये बैलांच्या झुंजीसाठी बुल डॉगचा उपयोग केला जायचा. एखादा समारंभ असला की मोकळ्या मैदानात मारका बैल सोडण्यात यायचा आणि त्यांच्यासोबत झुंजीसाठी बुल डॉगला मैदानात सोडण्यात यायचे. बैलासोबत झुंज करून त्या बैलाला शांत करण्याचे कसब या श्वानांमध्ये होते. ही झुंज पहाण्यासाठी बघ्यांची गर्दी व्हायची. कालांतराने ही पद्धत बंद झाली. मात्र बैलाशी झुंजण्याचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या या धीट बुल डॉगने घराघरांत स्थान मिळविले. ब्रिटिश हाऊंड असेही या श्वानांना संबोधले जायचे.
या श्वानांचा स्वभाव शांत असला तरी हे अतिशय सतर्क असतात. कितीही मोठा प्राणी समोर आला तरी त्यांच्याशी सामना करण्याचे सामथ्र्य या श्वानांमध्ये असते. एखाद्या वेळी धोका असल्याची शंका आली तर हे कुत्रे कोणत्याही प्रकारे समोरच्यावर झडप घालू शकतात. घाबरणाऱ्या श्वानांपैकी हे श्वान नाहीत. या श्वानांजवळ असणाऱ्या आत्मविश्वासू आणि धीट वृत्तीमुळेच यांचे पालन केले जाते. धीट स्वभाव हे या श्वानांचे प्रमुख वैशिष्टय़ आहे आणि ते आजतागायत कायम आहे. विविध प्रकारे ब्रीडिंग करूनही या श्वानांचे मूळ वैशिष्टय़ कायम आहे.
दुर्मीळ असल्याचे महाग
इंग्लिश बुल डॉग हे ब्रिडिंगला अतिशय अवघड आहेत. वेगवेगळी तंत्र वापरून या श्वानांचे ब्रििडग करावे लागते. बऱ्याचदा या श्वानांचे सिजरिंग करावे लागते. अवघड ब्रििडगमुळे या श्वानांचा जन्मदर फार कमी असल्याने या श्वानांच्या खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागतात.
विविध डॉग शोजमध्ये मोठय़ा प्रमाणात इंग्लिश बुल डॉगला मागणी असते. ब्रिटिश कॅनेलमध्ये अ‍ॅडम नावाच्या पहिल्या इंग्लिश बुल डॉगची नोंदणी झाली. १८६४ मध्ये त्याचा जन्म झाला. तेव्हापासून या श्वानांची नोंदणी सुरू झाली. युरोप आणि इंग्लंडमध्ये मोठय़ा प्रमाणात या श्वानांना मागणी आहे.

घरात पालनासाठी स्वतंत्र जागा हवी

घरात पाळायचे असल्यास या श्वानांसाठी खास राखीव जागेची आवश्यकता असते. नवीन एखादी व्यक्ती घरात आल्यास त्यांना ओळख करून द्यावी लागते. अन्यथा त्यांच्यावर हल्ला करण्यास हे तत्पर असतात. मालकाच्या धाकात या श्वानांना ठेवणे गरजेचे असते. भारतात दिल्ली, पंजाब, चेन्नई, मुंबई येथे मोठय़ा प्रमाणात हे श्वान आढळतात.

ओबडधोबड तरीही लोकप्रिय
इंग्लिश बुल डॉग हे दिसायला आकर्षक नाहीत. आकाराने लहान, पाय आखूड यामुळे या श्वानांची एकूणच शरीरयष्टी ओबडधोबड भासते. मात्र या श्वानांचे हेच वैशिष्टय़ त्यांच्या लोकप्रियतेत भर घालते. पाहता क्षणीच एखाद्याला भीती वाटेल एवढा या श्वानांच्या दिसण्यात भारदस्तपणा असतो. याच कारणासाठी घराचे रक्षण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात हे श्वान पाळले जातात.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

उष्णता बाधते
या कुत्र्यांना थंड वातावरणात राहण्याची सवय असल्याने अतिउष्ण वातावरण या श्वानांना बाधक ठरते. या श्वानांना नियमित व्यायामाचीही गरज असते. दररोज चालणे किंवा मोकळ्या मैदानात खेळण्यास देणे ही या श्वानांची गरज आहे. तसे न झाल्यास जलद गतीने वजन वाढल्याने हृदयरोग, मधुमेह, सर्दी, कफ अशा प्रकारचे आजार या श्वानांना होण्याची शक्यता असते.