News Flash

गॅस कंपनीचा कर्मचारी भासवून लूटमार

दुपारच्या वेळी महिला एकटी असल्याची संधी साधून आरोपी घरात शिरायचा.

पोलीस मित्राच्या दक्षतेमुळे अटक
गॅस कंपनीचा प्रतिनिधी आहे, असे सांगून घरात घुसायचे आणि घरातील सदस्यांचे लक्ष नसेल तेव्हा मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारायचा, अशा प्रकारे लूटमार करणाऱ्या तरुणाला मीरा रोडमध्ये अटक करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांच्या मदतीसाठी सज्ज असलेल्या एका पोलीस मित्रामुळे हा तरुण जेरबंद झाला.
प्रमोद मयेकर असे आरोपीचे नाव आहे. दुपारच्या वेळी महिला एकटी असल्याची संधी साधून आरोपी घरात शिरायचा. आपण गॅस कंपनीचे प्रतिनिधी असून मीटर रीडिंग घेण्यासाठी आलो असल्याचे तो भासवायचा. त्याच्या गोड बोलण्यावर महिलांचा सहज विश्वास बसत असे. घरातली महिला कामात गुंतलेली असताना आरोपी मौल्यवान चीजवस्तू लंपास करायचा आणि महिलेच्या ही बाब लक्षात येण्यापूर्वीच तेथून पोबारा करायचा. मीरा रोड परिसरात अशा अनेक घटना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी परिसरातली गस्त अधिक तीव्र केली.
पोलीस मित्रांनाही संशयास्पद स्थितीतील व्यक्तींवर लक्ष ठेवण्यास सूचित केले.
हा आरोपी नेमका एका पोलीस मित्राच्याच घरात शिरला. संशय आल्याने पोलीस मित्राने लगेचच पोलिसांना सावध केले आणि आरोपी अलगदपणे पोलिसांच्या हाती लागला. मयेकर हा याआधी एका गॅस कंपनीत कामाला होता. मात्र त्याला कामावरून कमी करण्यात आले होते.
आपल्या अनुभवाचा उपयोग त्याने चोऱ्या करण्यासाठी केला,
अशी माहिती नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.
के. जाधव यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2016 12:01 am

Web Title: fake gas company employee arrested by police
Next Stories
1 सरकारी जमीन खासगी कशी झाली?
2 ठाणे खाडी किनाऱ्यावरील अनधिकृत रेती उपशावर कारवाई
3 कळवा पोलीस ठाण्याचा नववर्षांत श्रीगणेशा
Just Now!
X