tvlog05गच्चीत, गॅलरीत झाडे लावणे, त्यापासून फुले, फळे, भाजीपाला घेणे यात कुटुंबातील सर्व सभासदांसाठी निसर्ग शिक्षणाचा एक भाग असतो. माती, वनस्पती, कीटक मातीतील जिवाणू यांचे परस्परांवर अवलंबून असणारे जीवन व निसर्गचक्राचा थोडय़ा प्रमाणात का होईना निरीक्षणामधून अभ्यास होतो. वेगवेगळ्या अन्नसाखळ्यांची माहिती होते. वनस्पतींच्या सहवासात राहिल्याने आरोग्य व वातावरण चांगले होते. तसेच स्वत: उत्पादन केलेल्या भाज्या फळ-फुलांचा आनंद घेता येतो. आपल्या आवडीनिवडी कमी होतात व ताटात अन्न टाकणे, वाया घालवणे कमी होते.
कुंडीत आपण आलटूनपालटून वेगवेगळ्या फळभाज्या घेऊ शकतो. त्या त्या फळभाजीचे आयुष्य संपल्यावर कुंडीतील मातीच्या वरचे झाड कापून टाकणे व त्या जागी हंगामानुसार दुसरे फळभाजीचे रोप लावावे, उपटून काढू नये. सर्व फळभाज्यांची रोपे तयार करून लावावी लागतात. यांची रोपे करण्यासाठी पसरट, उथळ कुंडी घ्यावी. त्यात आपल्या गरजेनुसार हव्या त्या फळभाजीचे रोप लावावे. जेवढी रोपे आवश्यक आहेत त्याच्या दुप्पट बी पेरावे. तसेच हे बी त्याच्या आकाराच्या किंवा जाडीच्या तिप्पट खोलीपर्यंत पुरावे. उगवेपर्यंत हलके हलके पाणी द्यावे. मातीची वाफसा स्थिती राहिली पाहिजे, जास्त पाणी झाल्यास उगवण नीट होत नाही, उशिरा होते किंवा बी कुजते. बी भिजून ‘संपृक्त’ झाल्यावर अंकुर येण्यास उष्णता आवश्यक असते. घरातील कडधान्यांना मोड येण्यासाठी कापडात घट्ट बांधून ठेवतात. मग त्याला मोड लवकर येतात. तेथे उष्णता तयार होते. फळभाज्यांच्या रोपांचे ट्रेसुद्धा विकत मिळतात. प्रकारानुसार त्यांची त्या त्या ऋतूत लागवड करतात.
कोबी, फ्लॉवर, ब्रुकोली, मुळा यांचे बी सारखेच दिसते. साधारण मोहरीसारखे. बी पसरट भांडय़ात ओळीत पेरून आधी रोपे तयार करून घ्यावीत. साधारण तीन ते चार आठवडय़ांची रोपे तयार झाल्यावर त्यांची पुनर्लागवड करावी व शक्यतो संध्याकाळी करावी. रोपे अलगद मुळासकट उपटावी. यासाठी स्क्रूड्रायव्हरसारखे अवजार वापरावे, जेणेकरून मुळांना धक्का न लागता मातीसकट रोपे निघतील. रोप लावताना शक्य असल्यास कपभर पाण्यात चमचाभर गोमूत्र चिमूटभर मीठ व हिंग पावडर घालून त्यात रोप बुडवून मग लागवड करावी. हे सर्व जंतुनाशक व बुरशीनाशक आहे किंवा कपभरऐवजी लिटरभर पाण्यात मिश्रण करावे व हे पाणी रोप लागवडीनंतर थोडे थोडे त्या रोपांच्या भोवती कुंडीतील मातीत ओतावे. रोप लागवडीपासून वांगी, मिरची, टोमॅटो, सिमला मिरची साधारण दोन महिन्यांत लागायला सुरुवात होते. यातील टोमॅटो सर्वात लवकर तर वांगी सर्वात उशिरा काढणीस तयार होतात. टोमॅटोचे मुख्यत: दोन प्रकार आहेत- एक झुडपासारखे वाढणारे व दुसरे वेलीसारखे वाढणारे. उदा. चेरी टोमॅटो वेलीसारखे वाढते, सर्वाना आधाराची गरज असते. टोमॅटोचे खोड ठिसूळ व पोकळ असते.
वांगी व मिरचीचा बहार संपल्यावर त्यांच्या फांद्यांची हलकी छाटणी करून परत परत उत्पादन घेता येते. साधारण वर्षभर सहज उत्पादन घेता येते.
कोबीचे आयुष्य ६० ते ७० दिवस तर फ्लॉवर व ब्रुकोली ६० ते ८० दिवस प्रकारानुसार पुनर्लागवडीपासून असते. जातीप्रमाणे तसा गड्डा या कालावधीत तयार होतो. बी खरेदीमध्ये अडचण अशी आहे की, याचे बी थोडय़ा प्रमाणात मिळत नाही. अगदी कमीत कमी १० ते ३० रु.चे पाकीटसुद्धा आपल्यासारख्या चार-पाच जणांना पुरतील एवढय़ा असतात. आपण गच्चीवर भाजी लावणाऱ्या समविचारी मित्र-मैत्रिणींचा गट तयार करावा किंवा त्यांना प्रवृत्त करावे. त्यापैकी प्रत्येकाने एकप्रकारचे बी घेऊन रोपे तयार करावीत व एकमेकांत त्यांची देवाणघेवाण करावी.
रोपे लावल्यानंतर त्यांना वाढीच्या अवस्थेत अन्न व संरक्षणाची गरज असते. जवळच्या कृषी केंद्रामध्ये वेगवेगळ्या पेंडी मिळतात किंवा त्यांचे मिश्रण मिळते. सध्या गोदरेज कंपनीचे ‘विकास’ नावाचे सेंद्रिय खत मिळते. जे उपलब्ध होईल ते प्रत्येक कुंडीत समसमान प्रमाणात ठरावीक अंतराने वरच्या मातीत घालावे. मांसाहारी लोकांनी मासे मटण धुतलेले पाणी घालावे. तर शाकाहारी लोकांनी डाळ, तांदूळ धुतलेले पाणी घालावे. तसेच मिश्र कडधान्यांना मोड आणून सर्व प्रकारची कडधान्ये एक चमचा घेऊन ते मिक्सरमधून काढून त्यात पाणी मिसळून त्या पाण्याचा फवारा झाडावर करावा व मातीमध्येसुद्धा ते पाणी घालावे. दहा-पंधरा दिवसांच्या अंतराने असे केल्यास झाडाचे पोषण चांगले होते. चहाचा चोथा नीट धुऊन तोसुद्धा कुंडीत घालावा. झाडाला फवारणी म्हणून एक लिटर पाण्यात एक कप गोमूत्र टाकून त्या पाण्याची फवारणी केली असता झाडाचे कीड व रोगांपासून संरक्षण होते. मधून मधून आंबट ताक व कच्चे दूध पाण्यातून फवारावे. एक लिटर पाणी, त्यात चार चमचे ताक किंवा दूध घालावे. याने झाडांना व्हायरस येत नाही.
वरील सर्व उपाययोजनांमधून आपण आपल्या झाडांचे पोषण व संरक्षण चांगल्या प्रकारे करून फळभाज्यांचे आरोग्यदायी उत्पादन गच्चीत, गॅलरीत नक्की घेऊ शकतो. म्हणजे गच्चीवर किंवा गॅलरीत पावसामुळे गळती होऊ नये म्हणून वॉटर प्रूफिंग केलेले असते. त्यामुळे कुंडय़ांमुळे गळती होते हा निव्वळ गैरसमज आहे. मात्र, कुंडीतील पाण्याच्या गळतीने इमारतीच्या किंवा घराच्या भिंतीवर डाग पडू नये, यासाठी त्याखाली पसरट भांडे किंवा ट्रे ठेवावे. ज्यामुळे जास्तीचे पाणी त्यात जमा होईल व त्याचे ओघळ दिसणार नाहीत. दुसरा फायदा म्हणजे जास्तीचे जमा झालेले पाणी सायफन करून वनस्पती त्यांना गरज असेल तेव्हा शोषून घेऊ शकतील.

माती अन् वनस्पतीचे नाते
वनस्पतींच्या वाढीसाठी असणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पतींची मुळे जिथे वाढतात ते माध्यम. आपल्याला माहिती असतेच की, वनस्पती जमिनीमधून (माती) अन्न व आधार घेतात. यासाठी आपण कुंडय़ा, जुन्या बादल्या, बाटल्या, ड्रम, इ.मध्ये माती भरतो व झाड लावतो. झाडाची मुळे मातीमधील असंख्य प्रकारचे जिवाणू, बुरशीचे प्रकार वनस्पतींना मातीतील अन्नसाठा रूपांतरित करतात, ज्यायोगे वनस्पतीला अन्न मिळते. म्हणून मातीतील सूक्ष्म जिवाणूंचे (मायक्रो ऑर्गनायझम) महत्त्व असते. या जिवाणूंच्या योग्य वाढीसाठी मातीत योग्य प्रमाणात ओलावा लागतो, त्याचबरोबर मातीमध्ये हवासुद्धा असणे आवश्यक असते, ज्याला आपण सच्छिद्रता (ढ१४२ल्ली२२) म्हणतो. यासाठीच आपण कुंडीतील माती वरखाली करून मोकळी करतो. मातीतील जिवाणू व वनस्पतींची मुळे यांची कार्यक्षमता मातीमध्ये ४५% माती (माध्यम), ५% सेंद्रिय घटक (कुजलेले शेणखत, कंपोस्ट, इ.), २५% पाणी व २५% हवा या अवस्थेवर अवलंबून असते.

treatment in private hospitals
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित
Rat tail in student food akola
अकोला : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात उंदराचे शेपूट! दहा विद्यार्थ्यांना विषबाधा
Devotees demand through a march in Kolhapur
बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची सीआयडीकरवी करा; कोल्हापुरात मोर्चाद्वारे भक्तांची मागणी
Infrastructure boosts real estate sector
पायाभूत सुविधांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना

फळभाज्यांची लागवड
उन्हाळ्यात :  मिरची, वांगी, भेंडी, गवार.
हिवाळा : कोबी, फ्लॉवर, ब्रुकोली, चायनीज कोबी, मुळा, नवलकोल, ढेम्स (टिंडा), गवार, सिमला मिर्ची, इ.
पावसाळा : भेंडी, वांगी, मिरची (उन्हाळी).
राजेंद्र भट