अंगात कुर्ता-पायजमा, त्यावर बंदगळा जॅकेट, पायात कोल्हापुरी चपला असा पारंपरिक वेश आता तरुणाईतील विशेष फॅशन बनला आहे. त्यातच आता भर पडलीय ती कपाळावरच्या चंद्रकोरी टिळय़ाची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरील रुबाब आणि प्रसन्नता वाढवणारा हा चंद्रकोरी टिळा स्वत:च्या भाळी लावण्याचा नवा ‘ट्रेंड’ तरुणांमध्ये रुजत चालला असून पारंपरिक वेशभूषेसोबत हा टिळा आता ‘फॅशन’ची नवी खूण बनू पाहात आहे. त्यामुळेच अलीकडच्या काळात बाजारात असे टिळे कोरून देणारे कारागीर आणि स्वत:लाच कोरता यावे यासाठी तयार साचे यांची चांगलीच चलती आहे.
ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेवर आधारित ‘फॅशन’ हा ट्रेंड जुना असला तरी त्यातही दिवसेंदिवस नवनवीन भर पडत आहे. कालपरवापर्यंत नऊवारी साडी नेसल्यानंतर त्याला अनुरूप अशी चंद्रकोर कपाळावर रेखाटून घेण्याला महिलावर्गाची पसंती असे. मात्र, आता ही चंद्रकोर पुरुषांच्या ‘फॅशन’मध्येही रुजू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह आणखी काही ऐतिहासिक महापुरुषांच्या कपाळावर दिसणारी ही चंद्रकोर सध्याच्या     
 तरुण वर्गालाही आपलीशी वाटू लागली आहे. त्यामुळेच पारंपरिक वेशभूषेवर चंद्रकोरी टिळा आणि डोक्याला फेटा गुंडाळण्याचा ‘ट्रेंड’ वाढत आहे. केवळ चंद्रकोरच नव्हे तर शंकराच्या ‘त्रिपुंड’ आकाराच्या टिळ्याचे आकर्षण तरुणांमध्ये वाढू लागले आहे.
गडदुर्ग संवर्धन क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले अजित राणे गेल्या चार वर्षांपासून अशा प्रकारचा टिळा लावतात. ठाण्यात राहणारा मनोज दंत हादेखील नियमितपणे कपाळी चंद्रकोर उमटवतो. आपल्या मित्रांनाही या चंद्रकोरीचे अप्रूप वाटते, असे तो सांगतो. राजकारणात येत असलेली नवी पिढीदेखील चंद्रकोरीच्या आकर्षणापासून दूर नाही. अशा नव्या राजकीय मंडळींसाठी चंद्रकोर ही आपल्या राजकीय भूमिकेचे प्रतीक दाखवणारी निशाणी ठरत आहे.  चंद्रकोर साकारण्यासाठी प्रत्येक आकाराचे वेगवेगळे साचे बाजारात उपलब्ध आहेत. आता तर पुरुषांसाठीही चंद्रकोरी टिकल्या बाजारात उपलब्ध होत आहेत.
श्रीकांत सावंत, ठाणे

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!