07 March 2021

News Flash

पित्याकडून बालकाला तापलेल्या चमच्याचे चटके

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराज साळवे यांच्या आदेशावरून सचिनला अटक केली.

कल्याण : वडील भोजन करत असताना सहा वर्षांचा मुलाने समोरच बसून लघुशंका केली. याचा राग अनावर झाल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी शिक्षा म्हणून तापलेल्या चमच्याचे चटके मुलाच्या सर्वागावर दिले. मुलाचे नातेवाईक कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मुलाला घेऊन गेले, तेव्हा सगळा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले.

कल्याण पूर्वेतील विजयनगर भागात सचिन कांबळे मुलासह राहतात. त्यांची एकूण तीन लग्ने झाली आहेत. दोन पत्नीचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या पत्नीपासून सचिनला एक मुलगा आहे. त्याचा सांभाळ सचिन करतो. शनिवारी सचिन कांबळे घरात भोजन करीत होता. त्याच वेळी त्याच्या सहा वर्षांच्या मुलाने नकळत चड्डीत लघुशंका केली. त्याचा राग आल्याने सचिनने गॅसवर चमचा गरम करून त्याचे तप्त चटके मुलाच्या पाय, मांडी आणि पाश्र्वभागाला दिले. चटके देत असताना मुलगा ओरडत होता. त्यामुळे परिसराला याची माहिती कळली. याबाबत माहिती मिळताच मुलाचे नातेवाईक सचिनच्या घरी आले. त्यांना सचिनने पिटाळून लावले. अखेर काही नातेवाईकांनी मुलाला कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराज साळवे यांच्या आदेशावरून सचिनला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:25 am

Web Title: father gave the child a hot spoonful in kalyan zws 70
Next Stories
1 मालमत्ता नावावर करण्यासाठी पतीचा छळ
2 पाणी असूनही वसईकर तहानलेले
3 पालिकेची स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू
Just Now!
X