25 February 2021

News Flash

‘आरटीओ’ कार्यालयात विनयभंग

माहिती अधिकार कार्यकर्त्यांला अटक

प्रतिनिधिक छायाचित्र

माहिती अधिकार कार्यकर्त्यांला अटक

ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कथित माहिती अधिकार कार्यकर्ता शरद धुमाळ याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.

धुमाळ याने गेल्या पाच वर्षांत ‘आरटीओ’ कार्यालयात सुमारे १५०० माहिती अधिकाराचे अर्ज केले होते. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.

पीडित महिला ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लिपीक पदावर कार्यरत आहे. तर भिवंडी येथील रहिवासी असलेला शरद धुमाळ हा माहितीच्या अधिकारात माहिती मिळविण्यासाठी कार्यालयात येत असतो. त्यावेळी वारंवार अश्लील शेरेबाजी तो करतो, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

कार्यालयातील इतर महिलांकडे पाहूनही तो अश्लील शेरेबाजी करत असे. याबाबत काही महिलांनी विशाखा समितीकडे तक्रार दिली होती. मात्र, समितीच्या सुनावणीलाही तो गैरहजर राहत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, वागळे इस्टेट पोलिसांनी विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करीत धुमाळ याला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 1:05 am

Web Title: female employees molested rto office zws 70
Next Stories
1 पत्रीपूल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला
2 जुन्या-नव्या घोषणांची सरमिसळ
3 ठाण्यात पाणी देयकांमध्ये सावळागोंधळ
Just Now!
X