19 September 2020

News Flash

सुटीच्या सोयीने सण साजरे

शहरी जीवनशैलीतील धावपळीच्या दिनक्रमामुळे नागरिकांनी हल्ली पारंपरिक सण आणि उत्सव तिथीऐवजी सोयीनुसार साजरे करण्यास सुरुवात केली आहे.

| August 27, 2015 12:57 pm

शहरी जीवनशैलीतील धावपळीच्या दिनक्रमामुळे नागरिकांनी हल्ली पारंपरिक सण आणि उत्सव तिथीऐवजी सोयीनुसार साजरे करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच नावातच विशिष्ट दिवसाचा निर्देश असलेली श्रावण महिन्यातील मंगळागौर आता मंगळवारऐवजी महिलांच्या सोयीनुसार चक्क रविवारी साजरी होऊ लागली आहे.यंदा योगायोगाने नारळी पौर्णिमा शनिवारी आहे. मात्र एरवीही शहरी भागातले रक्षाबंधन हल्ली त्या दिवसाच्या आधी अथवा नंतरच्या रविवारी अथवा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी होऊ लागले आहे.आश्विन महिन्यात येणारी कोजागरीची रात्रही पूर्ण चंद्रदर्शनाची अपेक्षा न बाळगता सोयीनुसार आगे-मागे येणाऱ्या शनिवार-रविवारी ठरवून जागवली जाते. श्रावण महिन्यात सोमवार-शनिवारी घरोघरी उपवास, पंचपक्वानांच्या जेवणावळी उठत. सोमवारचा उपवास संध्याकाळी तर शनिवारचा दुपारी सोडण्याची प्रथा होती. आता दुपारी उपवास सोडण्याची प्रथा जवळपास बंद झाली आहे. धावपळीच्या दिनक्रमामुळे नोकरी-व्यवसायात व्यक्त असणाऱ्या बहुतेकांनी श्रावण महिन्यातील सोमवार-शनिवारचे उपवास करणे सोडून दिले आहे. तर धावपळीच्या जीवनशैलीमुळे जडणाऱ्या मधुमेह तसेच रक्तदाब आदी व्याधींमुळे अनेकांना उपवास करणे शक्य होत नाही. त्यामुळे मांसाहार वज्र्य करण्यापुरतेच श्रावणाचे औचित्य उरले आहे.

सार्वजनिक उत्सवांमध्ये सोय महत्त्वाचीच
पारंपरिक सण आणि उत्सव माणसांसाठी, त्यांच्या आनंदासाठी आहेत. त्यामुळे विशिष्ट दिवस अथवा मुहूर्तापेक्षा ते सोयीनुसार होण्यात काहीच गैर नाही. वैयक्तिक आयुष्यात विशिष्ट दिवशी सण साजरे करणे शक्य असले तरी  सार्वजनिक उत्सवांमध्ये सर्वाची सोय पाहणे गरजेचे ठरते. महिलांनी एकत्र येणे हा मंगळागौरीमागचा मुख्य हेतू आहे. आता अनेक महिला नोकरी करतात. त्यांच्या दृष्टीने मंगळवार गैरसोयीचा असतो. कारण रात्री जागरण झाले तर दुसऱ्या दिवशी त्याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होऊ शकतो. आता अमेरिकेतही गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. मात्र तिथे चतुर्थीला नव्हे तर त्या काळात येणाऱ्या शनिवार-रविवारी गणेश पूजन केले जाते आणि त्यात गैर असे काहीच नाही
-दा. कृ. सोमण, पंचागकर्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 12:57 pm

Web Title: festival celebrating as per the holidays or convenient
Next Stories
1 ७५ वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेच्या बाकांवर
2 एलबीटीची तूट भरून काढण्यासाठी करवसुलीवर भर
3 महिला-बालकल्याण विभागाकडे अंबरनाथ नगरपालिकेचे दुर्लक्ष
Just Now!
X