News Flash

डोंबिवलीत फेरीवाल्यांत हाणामारी

ठाणे शहराप्रमाणे डोंबिवलीतही फेरीवाल्यांची मुजोरी वाढत चालली आहे.

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेच्या छेडा रस्त्यावर शुक्रवारी फेरीवाल्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली. चार परप्रांतीय फेरीवाल्यांनी काठीने फेरीवाल्यांच्या दुसऱ्या गटाला मारहाण केली. या प्रकरणी चार फेरीवाल्यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ते चौघेही फरार झाले आहेत.

ठाणे शहराप्रमाणे डोंबिवलीतही फेरीवाल्यांची मुजोरी वाढत चालली आहे. त्यातून हा प्रकार घडल्याचे समजते. परशुराम मल्याली, जयेश मल्याली, विष्णू मल्याली, सुभाष मल्याली या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

छेडा रस्त्यावर गोळवली गावचे कमलाकर पाटील आणि त्यांची पत्नी भाजी विक्री करत होते. त्याच्या बाजुला परशुराम मल्याली आणि त्याचे चार साथीदार ओरडून भाजीविक्री करत होते.  त्यांच्या ओरण्याचा व्यापारी, पादचाऱ्यांना त्रास होतो. ओरडून व्यवसाय करू नका, असे कमलाकर यांच्या पत्नीने चौघांना सांगितले. त्याचा त्यांना राग आला.  त्यांनी कमलाकर पाटील यांना  बेदम मारहाण केली. कमलाकर यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे.

पालिकेची फेरीवाला हटाव पथके तात्पुरती कारवाई करून परत येतात. त्यानंतर फेरीवाले पुन्हा रस्त्यावर येऊन बसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 1:25 am

Web Title: fighting dombivli crime news police akp 94
Next Stories
1 भिवंडीत घराचे बांधकाम कोसळून एकाचा मृत्यू; सहा जखमी
2 Video : फेरीवाल्याच्या हल्ल्यात तीन बोटे गमावलेल्या कल्पिता पिंपळेंना मुख्यमंत्र्यांनी केला फोन
3 “सर फक्त एवढीच विनंती आहे की…”; कल्पिता पिंपळेंनी प्रकृतीची चौकशी करणाऱ्या उद्धव ठाकरेंकडे केली मागणी
Just Now!
X