07 August 2020

News Flash

संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्या

आदित्य ठाकरे यांच्या सूचना

आदित्य ठाकरे यांच्या सूचना

ठाणे : शहरांतील करोना रुग्णांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा शोध वाढवा. तसेच महापालिकांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षांमध्ये सुविधांचा दर्जा राखा, अशा सूचना राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे जिल्ह्यातील महापालिका आयुक्तांना दिल्या.

ठाणे महापालिका मुख्यालयात शनिवारी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबतआदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरुवातीस ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि मीरा-भाईंदर या सर्व महापालिकेच्या वतीने करोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील महापालिका आयुक्तांना करोना चाचण्यांची क्षमताही वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहरात उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षातून नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले.

या बैठकीस ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 3:43 am

Web Title: find people in contact of coronavirus patients says aditya thackeray
Next Stories
1 नायगाव पूर्वेतील परिसराला करोनाचा विळखा
2 रुग्णालयात प्रवेश न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू
3 ‘मीरा-भाईंदरची शासनाने दखल घ्यावी’
Just Now!
X