News Flash

भिवंडीतील पूर्णा गावात गोदामाला भीषण आग

आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत

भिवंडीतील पूर्णा गावात असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागली आहे.  ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. भिवंडीतील पूर्णा गावात असलेल्या मायाश्री कंपाऊंडमध्ये असलेल्या गोदामाला आग लागली आहे. ही आग नेमकी कशी लागली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाण्यातील अग्निशमन दलातूनही गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. या परिसरात धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसून येत आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पूर्णा, राहनाळ, अंजूर या गावांमध्ये बहुतांश कंपन्यांची गोडाऊन आहेत. याआधीही या ठिकाणी आग लागण्याची घटना घडली आहे. आता पुन्हा एकदा पूर्णा गावात एका गोडाऊनला आग लागली आहे. ही आग नेमकी का लागली ते अद्याप समजू शकलेलं नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 11:54 am

Web Title: fire breaks out at a godown in thanes purna area 2 fire tenders present at the spot no injuries casualties reported scj 81
Next Stories
1 Video : डोंबिवलीत फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी, महिलेलाही जबर मारहाण
2 दिवाळीनिमित्त ठाणे, डोंबिवलीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी
3 बाजारावर मळभ!
Just Now!
X