डोंबिवली एमआयडीसी परिसरतातल्या शारदा कंपनीला मोठी आग लागली आहे. अजूनही ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रय़त्न सुरू आहेत. घटनास्थळी केडीएमसीचे ७, उल्हासनगर आणि भिवंडी महानगपालिकेचा प्रत्येकी एक आणि डोंबिवली एमआयडीचा १ बंब दाखल झाला आहे. ही आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रय़त्न सुरू आहेत. डोंबिवली MIDC च्या फेज टू मध्ये शारदा कंपनी आहे. ही आग नियंत्रणात येत नसल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी सुरेश शिंदे यांनी दिली. या आगीत आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.