News Flash

कल्याण: लिफ्टमध्ये अडकले तीन चिमुकले; तब्बल दोन तास सुरु होते बचावकार्य

कल्याण पश्चिमेतील टिळक चौक परिसरातील घटना...

रहिवाशी इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन लहान मुलांची तब्बल दोन तासांनंतर सुटका करण्यात आली. मंगळवारी कल्याण पश्चिमेतील टिळक चौक परिसरात ही घटना घडली होती.

कल्याण पश्चिमेला खेडा अव्हेन्यू नावाची पाच मजली इमारत असून मंगळवारी संध्याकाळी साडे सहावाजेच्या सुमारास तीन मुलं तळ मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेले होते. पण काही तांत्रिक बिघाडामुळे ही लिफ्ट अचानक बंद पडली आणि मुलं लिफ्टमध्येच अडकली. यामध्ये ४ वर्षांची मुलगी आणि ८ तसेच १२ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश होता.

तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काहीही केल्या या लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे सोसायटीने सुरुवातीला संबंधित लिफ्ट कंपनीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना बोलवून प्रयत्न करून पाहीले. मात्र तांत्रिक बिघाड शोधण्याचे अनेक प्रयत्न करूनही या कर्मचाऱ्यांना काही केल्या हा दरवाजा उघडता आला नाही. अखेर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रॉलिक उपकरणाच्या सहाय्याने अवघ्या १५ मिनिटांमध्ये लिफ्टचा दरवाजा कापून संध्याकाळी साडे आठच्या सुमारास या तिन्ही मुलांची सुटका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 12:33 pm

Web Title: fire brigade rescues 3 kids stuck in residential buildings lift incident from kalyan sas 89
Next Stories
1 कर्मचारी म्हणतात, प्रवास नको रे बाबा.!
2 दोन खासगी रुग्णालयांची मालमत्ता जप्त होणार?
3 बेस्ट, एसटी बसमध्ये दुजाभाव
Just Now!
X