ठाण्यातील व्हिव्हिआना मॉलजवळ बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला.  एका रिट्झ कारने अचानक पेट घेतला आणि ही कार काही वेळातच जळून खाक झाली. ऐन रहदारीच्या रस्त्यावर या कारने पेट घेतला. त्यामुळे काही काळ बघ्यांचीही गर्दी जमली होती. लोक वाहने थांबवून ही बर्निंग कार बघत होते.  आग लागताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या एका बंबाने येऊन ही आग आटोक्यात आणली.

फोटो सौजन्य-दीपक जोशी

काही वेळापूर्वीच कारला लागेलली आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झाल्याचेही वृत्त नाही.

पाहा व्हिडिओ