08 December 2019

News Flash

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे

भिवंडीतल्या दापोडा या भागात असलेल्या केमिकल गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. केमिकलच्या गोदामात छोटे स्फोट सुरु असल्याचीही माहिती समोर आली आहे.

आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मागील बारा तासांपेक्षा जास्त काळ ही आग धुमसते आहे आणि ती आटोक्यात आणण्याचं काम सुरु आहे. मागील महिन्यातही या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली होती. भिवंडीतील दापोडा या ठिकाणी असलेल्या प्रेरणा कंपाऊंडमध्ये असलेल्या केमिकल गोडाऊनला ही आग लागली आहे. गेल्या बारा तासांपेक्षा जास्त काळ ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरात धुराचे प्रचंड लोट पाहण्यास मिळत आहेत.

First Published on July 23, 2019 7:43 am

Web Title: fire broke out in a chemical godown in bhiwandi scj 81
Just Now!
X