News Flash

डोंबिवलीत फरसाण दुकानात भीषण आग

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

डोंबिवलीत एका फरसाण दुकानात गुरुवारी रात्री भीषण आग लागली. (छाया: दीपक जोशी)

डोंबिवलीत एका फरसाण दुकानात गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झालेली नाही. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

डोंबिवली पूर्वेतील पी अँड टी कॉलनी परिसरात माया फरसाण हे दुकान आहे. या दुकानात गुरुवारी रात्री भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. मात्र, आग वेगाने पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुकानाच्या वर निवासी इमारत असल्याने चिंतेत भर पडली. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.

डिसेंबरमध्ये कुर्ला येथील भानू फरसाण या दुकानात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर आता डोंबिवलीतील फरसाण दुकानात आग लागली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नसली तरी या घटनेमुळे शहरातील दुकानांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

छाया: दीपक जोशी छाया: दीपक जोशी छाया: दीपक जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2018 12:42 am

Web Title: fire broke out inside maya farsan in dombivli east kdmc fire brigade on spot no casualties reported
टॅग : Dombivli,Fire
Next Stories
1 मेट्रोसाठी पुलांना कात्री
2 संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न गंभीर
3 ठाणे मेट्रोच्या कामाला मे महिन्यापासून प्रारंभ
Just Now!
X