News Flash

डोंबिवली स्टेशनजवळील लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग

स्टेशनजवळ असणाऱ्या लक्ष्मी निवास इमारतीमध्ये ही भीषण आग लागली आहे

डोंबिवलीत इमारतीला भीषण आग लागली आहे. रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या लक्ष्मी निवास इमारतीमध्ये ही भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर झाला आहे. दरम्यान इमारतीमधील रहिवासी तसंच दुकानदारांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीपासून जवळच पादचारी पूल आहे. आगीचे लोट या पुलापर्यंत जात आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली स्टेशननजीक असणाऱ्या लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. एका गोडाऊनमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठत असून जवळच्या पादचारी पुलावर पाहणाऱ्यांनी गर्दी केली आहे.

आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने अग्निशन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. दरम्यान इमारतीमधील रहिवासी तसंच दुकानातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 3:23 pm

Web Title: fire in building near dombivali station sgy 87
Next Stories
1 अधिक परताव्याच्या प्रलोभनाने ठाण्यात १२५ जणांची फसवणूक
2 उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांना १० हजार रुपये दंड
3 ठाणे पालिका उपायुक्त डॉ. केळकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा 
Just Now!
X