X

ठाणे – मुंब्र्यात प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

सुदैवाने आग लागली तेव्हा गोदामात कोणीही नव्हतं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली

मुंब्र्यातील प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. खान कंपाऊंजवळ असणाऱ्या भारत मार्केटमध्ये हे प्लास्टिकचं गोदाम आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि दोन वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीसदेखील घटनास्थळी उपस्थित आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा गोदामात कोणीही नव्हतं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.