वातानुकूलीत यंत्र आणि व्हेंटिलेटरमुळे रुग्णालयांत वीजेचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असल्याने रुग्णालयाच्या आवारात अग्निशमन दलाचे बंब तैनात ठेवण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महापालिका आयुक्तांना दिले. तसेच सध्या वाढत असलेल्या आगीच्या घटना टाळण्यासाठी त्रयस्थ संस्थांमार्फत परिक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबई महानगर क्षेत्रातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक पार पडला. उन्हाळा सुरु असल्याने वातानुकूलीत यंत्र आणि व्हेंटिलेटर यामुळे अतिरिक्त वीज वापरली जाते. यातून विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता आहेत.