28 November 2020

News Flash

फटाका व्यवसायाला करोनाचा फटका

ग्राहकांची गर्दी, मात्र खरेदी क्षमता घटली

ग्राहकांची गर्दी, मात्र खरेदी क्षमता घटली

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने सर्वच सणांवर त्याचा परिणाम झालेला आहे. करोनामुळे बाजारपेठेवर आलेली ही मरगळ फटाका व्यवसायातही दिसत आहे. या वर्षी फटाका खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असली तरी त्यांच्या खरेदी क्षमतेवर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक ग्राहक पूर्वीपेक्षा फटाक्यांची खरेदी कमी खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे फटाका व्यवसायात यंदा ३० टक्क्य़ांनी घट झाल्याचे फटाके विक्रेत्यांतर्फे  सांगण्यात येत आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे, खरेदीसाठी येणारे ग्राहक हे आवाजविरहित फटाके खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे या वर्षी दिवाळीमध्ये प्रदूषणाचे प्रमाण कमी असेल असे बोलले जात आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील कोपरी आणि उल्हासनगर भागात फटका विक्रीचे मोठे बाजार भरविले जाते. दरवर्षी ठाणे तसेच आसपासच्या शहरातून या फटाका बाजारात मोठय़ा प्रमाणात नागरिक फटाके खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र, यंदा करोनाचा प्रादुर्भाव देशात कायम असल्याने गणेशोत्सव, नवरात्र या सर्वच सणांवर त्याचा परिणाम झाला. दिवाळीत हा परिणाम कमी होईल असे सांगितले जात आहे. शहरात या वर्षीही फटाके बाजार भरलेले आहे. या बाजारात दरवर्षीप्रमाणे गर्दी झाल्याचे चित्र आहे. मात्र, फटाके खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची खरेदी क्षमता घटल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा व्यवसायात ३० टक्क्यांनी घट झाल्याचे फटाके व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. पूर्वी एक हजार रुपयांचे फटाके खरेदी करणारा ग्राहक आता, केवळ ७०० ते ८०० रुपयांचे फटका खरेदी करत आहेत, असे फटाके विक्रेत्यांनी सांगितले. तसेच खरेदीसाठी येणारे ग्राहक आवाजविरहित म्हणजेच, पाऊस, सुरसुरी आणि भूचक्रसारखे फटाके खरेदी करत आहेत. त्यामुळे प्रदुषणाचे प्रमाण या वर्षी कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.

खरेदीत काटकसर

एखादा ग्राहक पूर्वी एक हजार रुपयांचे फटाके खरेदी करीत असेल तर तो यंदा सातशे ते आठशे रुपयांचे फटाके खरेदी करीत आहे. ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही. मात्र, त्यांनी खरेदीचा खर्च कमी केला आहे. तसेच नागरिक आवाजांच्या फटक्यांऐवजी आवाजरहित फटाक्यांच्या खरेदीवर भर देत असून त्यामध्ये सुरसुरी, भुईचक्र,  पाऊस तसेच इतर फटाक्यांचा समावेश आहे, असे सतीश तिमये या फटाका विक्रेत्याने सांगितले.

बाजारात ग्राहकांची गर्दी आहे. मात्र, खरेदी क्षमतेत घट झालेली आहे. याचा ३० टक्के परिणाम व्यवसायात झालेला आहे.

– संजय आहुजा, फटाका विक्रेता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 2:39 am

Web Title: fireworks business hit by coronavirus in diwali zws 70
Next Stories
1 पार्किंगची सीमारेषा
2 मीरारोडला केबलचा विळखा
3 नालासोपारा येथे केबल व्यावसायिकाची क्रूर हत्या
Just Now!
X