21 January 2021

News Flash

भिवंडीत जमिनीच्या वादातून गोळीबार

या घटनेत अब्दुल मोहम्मद मन्सुरी हे गंभीर जखमी झाले. येथील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

प्रतिकात्मक

ठाणे : भिवंडी येथील गुलजार नगर भागात गुरुवारी रात्री जमिनीच्या वादातून अब्दुल मोहम्मद मन्सुरी (६५) यांच्यावर पिस्तूलने गोळ्या झाडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिराज मन्सुरी, वकील मन्सुरी, शकील मन्सुरी, इस्तियाक मन्सुरी, मुमताज अन्सारी, अब्दुल इब्राहिम मन्सुरी, इसरार मोमीन यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अब्दुल इब्राहिम मन्सुरी आणि इसरार या दोघांना अटक केली आहे.

अब्दुल मोहम्मद मन्सुरी हे गुलजार नगर परिसरात राहतात. गुरुवारी रात्री ते पायी जात असताना आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलाने दोन गोळ्या झाडल्या. या घटनेत अब्दुल मोहम्मद मन्सुरी हे गंभीर जखमी झाले. येथील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान यातील आरोपी हे अब्दुल मोहम्मद मन्सुरी यांचे नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी अब्दुल इब्राहिम मन्सुरी आणि इसरारला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली. उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून अब्दुलला ठार करण्याचा कट रचल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या कटामध्ये सिराज, वकील, शकील, इस्तियाक, मुमताज यांचाही सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. अब्दुल इब्राहिम मन्सुरी आणि इसरारला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 3:32 am

Web Title: firing in in bhiwandi over land dispute zws 70
Next Stories
1 श्रीदेवी कोविड रुग्णालयाचा परवाना रद्द
2 अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला अटक
3 पाना-फुलांनी सजलेल्या गौराईच्या आगमनाची चाहूल
Just Now!
X