ठाण्यातील काही इंग्रजी  तसेच मराठी माध्यमांच्या शाळा सोमवारपासून सुरु झाल्या आहेत. ठाण्यातील नौपाडा परिसरात असणाऱ्या सरस्वती सेकंडरी या शाळेत देखील आज सकाळपासून शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी शाळेच्या परिसरात  गर्दी केली होती. बऱ्याचदा शाळा सुरु होणाच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थी शाळेत जाताना रडताना दिसतात. परंतू ठाण्यातील शाळांमध्ये विद्यार्थी नवी उमेद आणि उत्साहात शाळेत प्रवेश करताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

बाजारातून नवीन दप्तर, नवीन वॉटरबॅग आणि कपडे घेतल्यानंतर आज पहिल्याच दिवशी वेळेत शाळेत पाठवण्यासाठी पालकांची लगबग दिसून आली. शाळेत आज पहिल्याच दिवशी पहिली ते चौथी पर्यंतची शाळा सुरु झाली. पहिल्या दिवशी चांगले मित्र भेटले असे शाळेतील काही विद्यार्थांनी सांगितले. यामुळे ते आनंदीत झाल्याचेही पाहायला मिळाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी नव्या उमेदीने वर्गात बसले, अशी प्रतिक्रिया देखील शाळेतील शिक्षकांनी दिली. विशेष म्हणजे मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होतानाचे दिसत असताना काही पालकांनी आपल्या मुलाला मराठी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले. मराठी शाळेत शिक्षण घेतल्यामुळे त्याला मातृभाषेवर अधिक चांगले प्रभुत्व मिळवता येईल, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटल्या. परिणामी पालकांच्या या भूमिकेमुळे दिवसेंदिवस इंग्रजी शाळेची क्रेझ वाढत असताना मराठी शाळेत देखील नव्याने दाखला घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येत वाढ झाली आहे, असे  शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. या किलबिलाटामध्ये उद्यापासून नियमित शाळा सुरु झाल्यानंतर खऱ्या अर्थानी विद्यार्थ्यांची किलबिलाट देखील दिसून येणार आहे. शहरातील काही शाळा या १५ जून पासून सुरु होणार आहेत.

pune, Young Man Arrested, Raping College Girl, Threatening with girl obscne Video, Pune Police Investigate, girl attempted suicide, crime in pune, pune news,
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा