केंद्रीय मत्स्य विभागाकडून ५ कोटी रुपयांचा निधी

कळव्यातील नागरिकांना मासे उपलब्ध व्हावेत या उद्देशाने परिसरात चार भव्य आणि सुसज्ज मासळी बाजार उभारण्यात येणार आहेत. या बाजारांच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. कळवा नाका, कळवा मासे बाजार, खारीगाव आणि विटावा या ठिकाणी हे बाजार उभे राहाणार आहेत. केंद्र सरकारच्या मत्स्य विभागाकडून सुमारे ५ कोटींचा निधी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला असून महापालिकेच्या मध्यमातून हा निधी खर्च केला जाणार आहे.

Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात
mumbai north lok sabha, malad malvani area
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : मालवणी अनधिकृत बांधकामांनी ग्रस्त

ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या कळवा परिसराची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे. मात्र या परिसरातील नागरिकांसाठी सुसज्ज मासळी बाजार उपलब्ध नव्हता. त्यामुळे मासळी बाजार उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. या उपक्रमासाठी आवश्यक असलेला ५ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या मत्स्य विभागाकडून ठाणे महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामध्ये ठाणे महापालिका १० टक्के निधी घालून कळव्यात चार ठिकाणी मासळी बाजार उभारणार आहे. मंगळवारी कळवा नाका आणि कळवा बाजारपेठेतील नियोजित मासे बाजारांच्या जागांचे भूमिपूजन करण्यात आले. तर पुढील आठवडय़ात विटावा आणि खारीगाव येथील बाजारपेठांचेही भूमिपूजन होणार आहे. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने मत्स्य विभागाने निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या बाजारपेठांचा मुंब्रावासीयांनाही उपयोग होणार आहे.

या ठिकाणी बाजार

  • कळवा नाका
  • कळवा मासे बाजार
  • खारीगाव
  • विटावा