25 September 2020

News Flash

व्यापारी जहाजांना  मच्छीमार रोखणार!

मंगळवारी व्यापारी जलमार्गाला विरोध करण्यासाठी राज्यातील मच्छीमार एकत्र येणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

व्यापारी जलमार्गाला विरोध करण्यासाठी मंगळवारी मुंबईत आंदोलन

केंद्र शासनाच्या प्रस्तावित व्यापारी जलमार्गाविरोधात देशभरातील मच्छीमार एकवटले असून मंगळवारी, ३० ऑक्टोबर रोजी याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या किनारी जिल्ह्यांमधील बहुसंख्य मच्छीमार आपला व्यावसाय बंद करून मुंबई बंदरात येणार असून आंदोलनाचा भाग म्हणून व्यापारी जहाजांना समुद्रामध्ये रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्यापारी जलमार्गाला मच्छीमारांनी तीव्र विरोध केला आहे. हा व्यापारी जलमार्ग अस्तित्वात आला तर मच्छीमारी व्यावसायावर अवलंबून असणाऱ्या १० कोटी नागरिकांवर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे मंगळवारी व्यापारी जलमार्गाला विरोध करण्यासाठी राज्यातील मच्छीमार एकत्र येणार आहेत. मच्छीमारांची एकत्रित सभा ससून डॉक येथे होणार आहे, अशी माहिती नॅशनल फिश वर्कर फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. या आंदोलनाच्या अनुषंघाने ठिकठिकाणी मच्छीमारांच्या सभा घेण्यात येत असून या आंदोलनामुळे सर्व मच्छीमार एकत्र आल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे. पर्ससीन, ट्रॉलर व पारंपरिक पद्धतीने करणाऱ्या मच्छीमारांमध्ये अंतर्गत मतभेद असले तरी या आंदोलनात सर्व मच्छीमार खांद्याला खांदा लावून सहभागी होतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

‘केंद्रीय मंत्र्यांना वेळ नाही’

प्रस्तावित व्यापारी जलमार्गाच्या विरोधात देशभरातील मच्छीमार एकवटले असताना केंद्रीय नौकानयन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना गेल्या दीड महिन्यांपासून मच्छीमारांशी चर्चा करण्यासाठी अवधी मिळाली नसल्याचे खंत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. या व्यापारी जलमार्गामुळे मच्छीमारांना पारंपरिक क्षेत्रामध्ये मासेमारी करण्यास मोठी अडचण निर्माण होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:41 am

Web Title: fishermen will stop the merchant ships
Next Stories
1 ‘बुलेट ट्रेन’विरोधात एल्गार
2 कुटुंब संकुल : पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण
3 ठक्करबाप्पा गैरव्यवहाराची फेरतपासणी
Just Now!
X