News Flash

ठाण्यात जळीतकांड, पाच बाईक आणि चार रिक्षा पेटवल्या

दोन महिन्यातले हे पाचवे जळीतकांड आहे

संग्रहित छायाचित्र

ठाण्यात दुचाकी जाळण्याचं लोण आलं आहे. अशात सोमवारी पहाटे ४ रिक्षा आणि ५ दुचाकी जाळण्यात आल्या. मागील दोन महिन्यात पाचवेळा वाहने जाळण्याचे प्रकार घडले आहेत. सोमवारी गावदेवी बस थांब्याजवळ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बजाज पल्सर ही दुचाकी पेटवण्यात आली. तर वागळे इस्टेट बस स्थानकासमोर पहाटे तीनच्या सुमारास चार रिक्षा आणि चार दुचाकी पेटवण्यात आल्या. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाईक जाळल्याप्रकरणी पोलिसांनी अजब बुबक या तरूणाला अटक केली आहे.

ठाण्यात पार्किंगमध्ये असलेली वाहने पूर्व वैमनस्यातून जाळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. आज घडलेली घटना ही दोन महिन्यातली पाचवी घटना आहे. याआधी घडलेल्या घटनांमधल्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. असे असूनही जळीतकांड घडत असल्याने वाहन मालक आणि चालक यांच्यात दहशत पसरली आहे. या जळीतकांडामागे कोणाचा हात आहे हे शोधण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत. जळीतकांडामागे कोणी सूत्रधार आहे का? त्याचा उद्देश काय? याचाही तपास पोलीस करत आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 8:39 pm

Web Title: five bikes and four auto torched in thane one arrested
Next Stories
1 ‘देशातील सर्वच संस्था सरकारने मोडीत काढल्या’
2 सोळा वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने सुरज वॉटर पार्कमध्ये मृत्यू
3 राष्ट्रीय महामार्गावर किती अपघात?, संकेतस्थळावर अपघातांची आकडेवारी उपलब्ध नाही
Just Now!
X