News Flash

नूतन यांच्या बंगल्यातील लूट; 

या दरोडय़ातील सहा दरोडेखोरांना मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे.

दिवंगत अभिनेत्री नूतन

पाच दरोडेखोरांना अटक

मुंब्रा येथील पारसिक डोंगरावर असलेल्या दिवंगत अभिनेत्री नूतन यांच्या बंगल्याच्या सुरक्षारक्षकांना मारहाण करून बंगल्यातील मौल्यवान वस्तू दरोडेखोरांनी लुटून पलायन केले होते. या दरोडय़ातील सहा दरोडेखोरांना मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. या आरोपींकडे पुरातन काळातील तलवार सापडली असून त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उदय मुखीकांत झा (१९), सूरज तारकेश्वर सिंह (१८), चंदन सतेंद्र सिंग (२१), जितू रामसबद गौतम (१९), चंदन शिवरतन पटवा (२१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व कळवा परिसरात रहाणारे आहेत. गुरुवारी पहाटे मुंब्रा रेतीबंदर परिसरातील पारसिक डोंगरावर असलेल्या अभिनेत्री नूतन यांच्या बंगल्यात सात ते आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडली होती. बंगल्यातील तीन सुरक्षारक्षकांवर दगडफेक करीत त्यांना तलवार व चाकूचा धाक दाखवीत या दरोडेखोरांनी बंगल्यातील मौल्यवान वस्तू चोरी करून नेल्या होत्या. बंगल्याचे सुरक्षारक्षक कैलास निगुडकर यांनी याप्रकरणी शुक्रवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याचदरम्यान मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांना रेतीबंदर परिसरात चार व्यक्ती या एका रिक्षात बसल्या असल्याची माहिती खबऱ्याने दिली. तायडे यांनी परिमंडळ १चे पोलीस आयुक्त डी. एस. स्वामी व कळवा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांना माहिती देत रेतीबंदर परिसरात सापळा रचून रिक्षातील उदय झा, सूरज सिंह, चंदन सिंग, जितू गौतम या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांना दरोडय़ातील दोन तलवारी, एक चाकू, लोखंडी पाइप व मिरची पूड मिळून आली. तसेच जुनी पुरातन काळातील तलवार मिळाली याविषयी पोलिसांनी चौकशी केली असता नूतन बंगल्यातील दरोडा टाकल्याची कबुली त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 3:50 am

Web Title: five held for robbery in nutan bungalow in thane
Next Stories
1 दुष्काळात बांधकामांचा सुकाळ!
2 ‘लोकसत्ता’च्या पाठपुराव्याची न्यायालयाकडून दखल
3 मासुंदा तलावाला दुर्गंधीची बाधा
Just Now!
X