21 September 2020

News Flash

भिवंडीत महिलेवर सामूहिक अत्याचार

या पाच जणांनी तिला शस्त्राचा धाक दाखवून जंगल परिसरात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.

ठाणे : भिवंडी येथील राहनाळ भागात शुक्रवारी रात्री ४२ वर्षीय महिलेवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

माँटी वरटे (२५), विशाल वरटे (२३), कुमार राठोड (२५) आणि अनिल गुप्ता (२८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भिवंडी परिसरात पीडित महिला राहते. ती शुक्रवारी सांयकाळी काही कामानिमित्ताने मैत्रिणीच्या घरी गेली होती. तेथील काम आटपून रात्री घरी परतत असताना राहनाळ येथील एका बोगद्याजवळील निर्जनस्थळी माँटी, विशाल, कुमार, अनिल आणि त्यांचा एक सहकारी मद्यप्राशन करत होते. या पाच जणांनी तिला शस्त्राचा धाक दाखवून जंगल परिसरात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.

दुसऱ्या दिवशी काही नागरिकांना पीडित महिला बेशुद्ध अवस्थेत या ठिकाणी आढळून आली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना अटक करण्यात आली असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 4:21 am

Web Title: five persons gang raped a 42 year old woman in bhiwandi zws 70
Next Stories
1 ठाणे : डिओड्रंट आणि चॉकलेट उधार दिले नाही म्हणून दुकानदारावर खुनी हल्ला
2 कल्याणमध्ये ‘मटका किंग’ची गोळ्या झाडून हत्या, आरोपींचा शोध सुरू
3 ठाण्यात मॉल, व्यापारी संकुले बंदच
Just Now!
X