News Flash

जामखेडमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचार

शहरात एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

(संग्रहित छायाचित्र)

कर्जत : शहरात एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मुलीच्या आईने रात्री उशिरा जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन शालन पवार (वय ३२) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी सचिनच्या घरी गेली असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार झाल्यावर चिमुरडीस त्रास होऊ  लागल्याने तिने आज याबद्दल आईला सांगितले. त्यामुळे तात्काळ तिच्या आईने जामखेड पोलीस ठाण्यात धाव घेऊ न फिर्याद दाखल केली. आरोपीविरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 6:47 am

Web Title: five year old young girl rape in jamkhed akp 94
Next Stories
1 नगरसेविकेच्या मुलास फसवणूकप्रकरणी अटक
2 उल्हास, वालधुनीचा कायापालट!
3 हॉटेलांतील लग्नसोहळ्यांत चोरी
Just Now!
X