26 September 2020

News Flash

ठाणे खाडीत रंगीबेरंगी पाहुण्यांची किलबिल

रोहित पक्ष्यांखेरीज नाना प्रकारच्या देशी-विदेशी पक्ष्यांचा राबता

(संग्रहित छायाचित्र)

रोहित पक्ष्यांखेरीज नाना प्रकारच्या देशी-विदेशी पक्ष्यांचा राबता

मानसी जोशी, ठाणे

मुंबईचा खाडीकिनारा सोडून ठाणे खाडीच्या आश्रयाला आलेल्या रोहित पक्ष्यांच्या थव्यांमुळे या खाडीवर लाल-पांढऱ्या रंगाची चादर पांघरल्याचे चित्र दिसत असतानाच, या चादरीला आता अन्य प्रजातीच्या रंगीबेरंगी पक्ष्यांमुळे नक्षीदार किनार लाभत आहे. युरेशियन स्पूनबील, नॉर्दन शॉवलर, ब्लॅक विंग स्टील, पाईड अवोसेट अशा वेगवेगळय़ा जातीच्या पक्ष्यांनी ठाणे खाडीत अधिवास केला असून त्यांच्या दर्शनासाठी खाडीकिनारी पर्यटकांची गर्दी होत आहे.

राज्य सरकारने ठाणे खाडी किनाऱ्यालगतचा परिसर यापूर्वीच रोहित पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. ठाणे आिंण नवी मुंबईच्या पाणथळ परिसरात दोनशेहून अधिक प्रजातींचे पक्षी, छोटे कीटक, फुलपाखरे आणि साप यांचा अधिवास आहे. सैबेरियाच्या थंड प्रदेशातून आलेल्या या परदेशी पाहुण्यांना विषुववृत्तीय हवामान चांगलेच मानवत असल्यामुळे नोव्हेंबरपासून ते मार्चपर्यंतचा चार महिन्याचा काळ हे भारताच्या पश्चिमेकडील खाडीकिनारी मुक्काम करतात. येथील कांदळवन या पक्ष्यांसाठी लाभदायक आहे. त्यामुळे बहुतांश रोहित पक्षी राजस्थान आणि कच्छ भागातून ठाण्यात स्थलांतरीत होतात, असे पक्षी अभ्यासकांचे मत आहे. त्यातच मुंबईतील शिवडी खाडीकिनारी सुरू असलेल्या विकासकामांमुळे तेथे आश्रय घेणारे पक्षीही आता नवी मुंबई व ठाणे खाडीकिनारी येऊन विसावू लागले आहेत.

ठाणे खाडी पट्टय़ात ६५ हजारहून अधिक फ्लेमिंगोंची नोंद झाली असली तरी, या पक्ष्यांखेरीज आणखी १२-१५ प्रजातीच्या पक्ष्यांची संख्याही लक्षणीय आहे. बदक आणि बगळय़ाच्या तीन नव्या प्रजाती यंदा खाडीकिनारी आढळल्याचे पक्षीनिरीक्षकांचे म्हणणे आहे. राखी बगळा, थापटय़ा, चमच्या, कवडय़ा, टीलवा तसेच महाराष्ट्राचा पक्षी म्हणून ओळखला जाणारा शेकटय़ा हे पक्षी येथे ठाण्याच्या खाडीकिनारी मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत.

ठाण्याच्या खाडीकिनारी पक्ष्यांसाठी असलेले खाद्य आणि त्यांना पोषक हवामान यामुळे फ्लेमिंगोंबरोबरच इतर पक्ष्यांच्या संख्येत या वर्षी वाढ झाली आहे. बदक, बगळे याच्या वेगवेगळ्या प्रजाती तसेच सँड पायपर यांसारख्या छोटय़ा पक्ष्यांनीही ठाणे आणि नवी मुंबईचा खाडी किनारा व्यापला आहे.

-आकाश पाटील, मार्गदर्शक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी

आढळलेले पक्षी (नोंद झालेली पक्षीसंख्या)

* ग्रे हेरॉन (राखी बगळा) – १,५०० ते २०००

*  ग्रेटर, लेसर फ्लेमिंगो (रोहित पक्षी) – ६५,०००

*  युरेशियन स्पूनबील (चमचा) – १००

*  नॉर्दन शॉवलर (मोरपिशी रंगाचे बदक) – ५०००

*  सँडर्लिग (कवडय़ा टीलवा)- १०००

*  ब्लॅक विंग स्टील (शेकटय़ा) – १५० -२००

*  क्युरेशियन कलर्यू (तुतारी) – ४५०-५००

*  पाईड अवोसेट (उचाटय़ा) – ५०००

*  प्लॉवर्स (चिंबोरी खाऊ) – ७०००-८०००

*  सीगल – ३०००

*  रेड वॉटेड (टिटवा) – २०००

*  रेड व्हिसलिंग डक (अडाई) – ३०००

*  इग्रेट (बगळा) – ४०००

ब्लॅक टेल गॉडवीट

(पाणटिवळा) – ५०००

रोहित पक्ष्यांच्या संख्येत वाढ

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अहवालानुसार २०१७ मध्ये ठाणे खाडीत ३५,००० ते ४०,००० फ्लेिमगो आढळले होते. २०१८ मध्ये ही संख्या २५ हजारांच्या आसपास होती. यंदा मात्र आतापर्यत ६५ हजार फ्लेिमगो पहाण्यात आले आहेत, अशी माहिती बीएचएनएसमधील सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 12:58 am

Web Title: flamingos birds arrive in thane creek
Next Stories
1 जीवनगाण्यांवर रसिकांचा ठेका ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’
2 मौज प्रकाशनचे संजय भागवत यांचे निधन
3 डहाणू, तलासरीतील घराघरांत भीतीचे ठाण
Just Now!
X