पर्यावरण दिनानिमित्त मुरबाडमध्ये आयोजन

नैसर्गिक साधनसंपत्तीचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करणाऱ्या हिरव्या देवाच्या जत्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुरबाडमध्ये आठवडाभर जत्रा भरविण्यात येणार आहे. २७ मे ते ५ जून या कालावधीत यानिमित्ताने जंगल संवर्धन मोहीम राबवली जाणार आहे.  सामूहिकपणे विविध उपक्रमांची आखणी, जंगल संवर्धनाचा आराखडा आणि सामूहिक वनभोजन असे या उपक्रमांचे स्वरूप आहे.  या अभियानामध्ये खड्डे खोदणे, गाळ काढणे, फुटणी, विरळणी अशी कामे श्रमदानाने तर विविध वयोगटांसाठी पर्यावरणाशी संबंधित स्पर्धा होतील. मुरबाड तालुक्यातील शिरवाडी (चाफे) येथे  स्पर्धा व पारितोषिक समारंभ होईल.

या कार्यक्रमाच ेआयोजन  ‘श्रमिक मुक्ती संघटना’ आणि ‘वन निकेतन’ यांनी केले आहे. २७ मे रोजी शिसेवाडी (चाफे) येथून  सुरुवात होईल. २८ मे रोजी हुम्बाची वाडी (दुर्गापूर), २९ मे (भांगवाडी), ३१ मे (दिवाणपाडा), १ जून (भेऱ्याची वाडी), २ जून (करपतवाडी, पेजवाडी), ३ जून (बनेवाडी- झाडघर) आणि ५ जून रोजी शिरवाडी-चाफे येथे हिरव्या देवाची जत्रा होईल. आधिक संपर्क- प्रभाकर देशमुख (९२२६११७०८७), दशरथ वाघ (९२०९७७२३०४).