वृक्ष लागवडीसाठी वनविभागाची क्लृप्ती; सहभागी होणाऱ्यांना शासनातर्फे पुरस्कार

तीन वर्षांत कोटींच्या घरात असलेला वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी राज्य सरकारने आता वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्र हरित सेना प्रकल्पाच्या (ग्रीन आर्मी) माध्यमातून वनविभागाशी संबंधित असलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्णत माफ करण्याचा महत्त्वपूर्ण घेण्यात आला आहे. शासनाच्या ग्रीन आर्मी प्रकल्पात स्वयंसेवकाची नोंदणी करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना वनक्षेत्र, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पांच्या ठिकाणी सहलींसाठी तिकीट दरात सवलती देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

bombay hc declare sawantwadi dodamarg corridor as ecologically sensitive
अन्वयार्थ : पुन्हा कान टोचले; आता तरी सुधारा..
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

जंगल परिसरात होणाऱ्या मानवी हस्तक्षेपाला आळा बसावा यासाठी वनविभागाची यंत्रणा कायम अपयशी ठरत असल्याची ओरड सातत्याने होत असते. विस्तीर्ण जंगल परिसराचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाकडे मर्यादित कर्मचारी वर्ग असल्याचे कारण पुढे केले जाते. या पाश्र्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना वन संरक्षण तसेच वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी करून घेतल्यास वन आणि वन्यजीवांचे संरक्षण करता येईल असे सरकारचे मत बनले आहे. या हेतूने सरकारने ऑनलाइन स्वयंसेवक नोंदणीप्रणाली विकसित केली असून या हरित सेना प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य पर्यावरणप्रेमींना हरित सेनेचे सदस्य होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रकल्पाचे सदस्य झाल्यावर आपापल्या वनक्षेत्रात आढळणाऱ्या वृक्ष, वन्यजीव संपदेविषयी माहिती संकेतस्थळावर प्रसारित करण्याची संधी वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार, पर्यावरणप्रेमींना मिळणार आहे. स्वयंसेवकांच्या आसपास असणाऱ्या वनांच्या अखत्यारित काही गैरप्रकार घडत असल्यास त्याचीही माहिती या संकेतस्थळावर देता येणार असल्याने नागरिक आणि वनविभाग यांच्यात सुसंवाद होणार असल्याचा दावा रेसकिंग असोसिएशन फॉर वाईल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन (रॉ) या संस्थेचे पवन शर्मा यांनी लोकसत्ताशी बोलताना केला.

वनविभागाच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट स्वयंसेवकांना शासनातर्फे पुरस्कार, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राचा उपयोग नागरिकांना नोकरी, व्यावसायिक कामासाठी वापरता येणार आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत किमान १ कोटी नागरिकांनी या प्रकल्पात नोंदणी करण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

कशी करावी हरित सेना नोंदणी?

  • mahaforest.nic.in या संकेतस्थळावर जाऊन Green Army Registration click here या पर्यायाची निवड करावी. किंवा greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येऊ शकते.
  • संपूर्ण नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेलआयडी, पासवर्ड, लिंग आणि जन्मतारीख अशी माहिती भरल्यावर नोंदणी करता येऊ शकते.
  • सदस्य नोंदणी करताना नागरिकांना पर्यावरणाशी संबंधित आपल्या आवडीचा पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. यात पक्षी निरीक्षण, वनपर्यटन, व्यावसायिक सामाजिक जबाबदारी(सीएसआर), पाणी संवर्धन, वन्यजीव, ट्रेकिंग असे विविध पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षकांची स्वाक्षरी असलेले महाराष्ट्र शासनाचे ‘महाराष्ट्र हरितसेना’ सदस्यत्व प्रमाणपत्र स्वयंसेवकांना ऑनलाइन उपलब्ध होते. सदस्य या प्रमाणपत्राची प्रत घेऊ शकतात.

पर्यावरणप्रेमी आणि वनविभाग यांच्या एकत्रित सहभागातून वनसंवर्धन होण्यासाठी हरितसेना प्रकल्प राबवण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रकल्पात सहभागी झाल्यास नागरिकांना त्याचा वैयक्तिक लाभ घेता येईल. याशिवाय वनविभागामार्फत उत्कृष्ट उपक्रम राबवण्यात मदत होईल. येऊर परिक्षेत्रातील एक लाख नागरिकांची नोंदणी करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे.

संजय वाघमोडे, परिक्षेत्र वन अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान