डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे संस्थापक विश्वस्त, नववर्ष स्वागत यात्रेचे प्रणेते आणि डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष श्रीपाद वामन पटवारी उर्फ आबासाहेब यांचे मंगळवारी रात्री येथील एका खासगी रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पटवारी कुटुंब हे मराठवाड्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याचे . ब्रिटिश अमदानीत पटवारी म्हणजे तलाठी म्हणून काम पाहायचे. पटवारींचे मूळ आडनाव भालेराव. पटवारी म्हणूनच ते प्रसिध्द झाले.  पटवारी यांचा जन्म नाशिक जिल्ह््यातील येवले तालुक्यातील बाळापूर येथे १७ ऑक्टोबर १९३४ रोजी झाला. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे आबासाहेब पटवारी यांचे माध्यमिक शिक्षण ठाण्यात मामाच्या घरी झाले. पोद्दार महाविद्यालयातून  एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी ठाण्यातील बी. जे. हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर कळवा येथील नॅशनल मशीनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत हिशेब तपासनीस म्हणून काम केले. सहकार क्षेत्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले

संघ कार्यातून त्यांचा पिंड सामाजिक कार्याकडे वळला. १९६४ मध्ये विवाह झाल्यानंतर ते ठाण्यातून डोंबिवलीत राहण्यास आले.  डोंबिवली जनसंघाचे ते अध्यक्ष झाले.  डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या स्थापनेत आबासाहेबांचा मोलाचा वाटा होता. डोंबिवली नगरपालिकेचे लोकांमधून थेट निवडून आलेले नगराध्यक्ष म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. नगरपालिकेच्या काळात गावात रस्ते, वीज, पाणी, कोपर पूल बांधण्यात आबासाहेब आघाडीवर होते. आणिबाणीच्या काळात त्यांनी १४ महिने तुरुंगवास भोगला.

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या उभारणीत आबासाहेबांचा सहभाग होता.  राज्य वित्त आयोग, विकास प्राधिकरण या  संस्थावर ते सदस्य होते.

श्री गणेश मंदिर संस्थानचे माजी अध्यक्ष, विविध माध्यम संस्थाचे सदस्य, सा. विवेकचे संपादक, डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारीने काम पाहिले.

नववर्ष स्वागत यात्रा देशभर नेण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या कवितांच्या अनुवादाचे काम त्यांनी केले होते. डोंबिवलीतील स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृति समिती, फेस्कॉम अशा अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे ते अध्वर्यू होते.