News Flash

नालासोपाऱ्यात ४ जण नाल्यात वाहून गेले, तिघांचे मृतदेह सापडले

वसई-विरार, नालासोपाऱ्यात सायंकाळी पाऊस थांबला.

Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

नालासोपाऱ्यात मुसळधार पावसात वाहून गेलेल्या ४ जणांपैकी ३ जणांचे मृतदेह सापडले. तर एकाचा अद्याप शोध सुरू आहे. नालासोपारा येथील नेवाळे ते देसाईवाडी येथे जात असताना दोघेजण दुचाकीसह वाहून गेले आहेत. यापैकी संदीप जाधव याचा मृतदेह नेवाळे तलावात सापडला तर त्याच्या सहकाऱ्याचा शोध सुरू आहे. त्याची ओळखही पटलेली नाही. वसईच्या माणिकपूर तलावात मंगळवारी रात्री दोघे अॅक्टिव्हा गाडीसह वाहून गेले आहेत. आकाश राय (वय २५) तर राजेश भोसले (वय ३२) अशी दोघांची नावे आहेत. या दोघांचे मृतदेह सापडले आहेत.

वसई-विरार, नालासोपाऱ्यात सायंकाळी पाऊस थांबला. नालासोपाऱ्यातील अनेक रस्ते, रेल्वे स्थानक परिसर पाण्याखालीच होते. सेंट्रल पार्क, तुलींज रस्त्यावर आताही गुडघाभर पाणी साचलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2017 10:41 pm

Web Title: four people were carried away in the drainage at nalasapora three bodies were found
Next Stories
1 मुसळधार पावसाने ठाणे-बोरीवली वाहतूक ठप्प!
2 एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
3 ठाण्याच्या महापौरांचा राजीनाम्याचा इशारा
Just Now!
X