24 September 2020

News Flash

करोना मृतांवर मोफत अंत्यसंस्कार  

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचा निर्णय

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचा निर्णय

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून यापूर्वी करोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी १२०० रुपये घेतले जात होते. मात्र, आता मोफत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो स्मशानभूमीत गॅसवर चालणारी शवदाहिनी सुरू केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून करोनामुळे मृतांचे प्रमाणही वाढत आहे. शहरात करोनामुळे दररोज सरासरी ५ ते ८ रुग्णांचा मृत्यू होत आहे. या मृतांवर शासनाच्या नियमानुसार शवदाहिनीत अत्यसंस्कार करणे बंधनकारक आहे. मात्र, या शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यासाठी १२०० रुपये शुल्क द्यावे लागत होते. परंतु आता हे शुल्कच माफ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. करोनामुळे मृत व्यक्तींच्या मृतदेहावर यापुढे शवदाहिनीत मोफत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतीच दिली. कल्याण पश्चिम परिसरातील प्रेम ऑटो स्मशानभूमीत महापालिकेने गॅसवर चालणारी शवदाहिनी सुरू केली असून  त्याच्या पाहाणीदरम्यान आयुक्तांनी ही माहिती दिली.

आणखी एक शवदाहिनी सेवेत

* कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात डोंबिवली पाथर्ली, शिवमंदिर , कल्याण बैलबाजार, लाल चौकी आणि विठ्ठलवाडी या ठिकाणी एकू ण पाच शवदाहिन्या कार्यरत आहेत.

* मात्र, महापालिका प्रशासनाने आता शहरातील प्रेम ऑटो स्मशानभूमीत आणखी एक शवदाहिनी सुरू केली आहे. या नवीन शवदाहिनीच्या कामासाठी  ५९ लाख ७६ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.

* यामध्ये स्मशानभूमीत अतिरिक्त ५ स्टॅडची शवदाहिनी, प्रार्थना

सभागृह आणि वाढीव प्रतीक्षालय मंडप घालण्यासाठी अतिरिक्त खर्च करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:21 am

Web Title: free funerals on corona dead body in kalyan dombivali zws 70
Next Stories
1 वादळी पावसाचा धुमाकूळ
2 महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
3 Coronavirus : रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर
Just Now!
X