ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते मैत्री दिवस साजरा करण्याचे. विशेषत: महाविद्यालयीन तरुणांमध्ये या दिवसाचे भलतेच आकर्षण असते. गेल्या काही वर्षांपासून जुन्या शालेय मित्रांसोबत ‘स्नेहमेळावा’ आयोजित करण्याचा ट्रेंड भलताच लोकप्रिय ठरू लागला आहे. हेच शालेय मित्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात एकत्र येऊन मैत्रीदिवस साजरा करताना आपणास जागोजागी आढळून येतात. आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देताना महाविद्यालयीन कट्टे, उपाहारगृहे अक्षरश: भरून वाहत असल्याचे चित्र दिसून येते. केवळ भेटून मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणे एवढय़ापुरता हा दिवस मर्यादित राहिलेला नाही. आपल्या मित्र-मैत्रिणीला मैत्रीचे प्रतीक म्हणून एखादी भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करण्याचा कलही सध्या वाढला आहे. त्यामुळे मैत्री दिनाचा हा बाजार भलताच तेजीत आला आहे. त्यामुळे मैत्री दिनाच्या आठवडाभर आधीच या विशिष्ट भेटवस्तू बाजारात मिळायला सुरुवात होते. अलीकडे या भेटवस्तूंमध्ये खूप मोठय़ा प्रमाणात वेगळेपण येत असल्याने तरुणांना भेटवस्तू देण्यासाठी अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. या पर्यायांमुळे नेहमीच प्रत्येक गोष्टीत काहीतरी नावीन्य शोधणाऱ्या या मंडळींसाठी आपल्या मित्र-मैत्रिणींना यंदाही काहीतरी हटके भेटवस्तू देता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे भेटवस्तूंमधील वेगळेपण कायम आहे, अशी माहिती ठाण्यातील राम मारुती मार्गावरील सेलिब्रेशन दुकानाचे मालक हितेश सत्रा यांनी दिली. या वर्षीच्या काही अनोख्या भेटवस्तूंचा आढावा..
ब्रोकन लॉकेट : एरवी आपण आपल्या प्रिय व्यक्तीला नेहमीच म्हणतो माझे हृदय कधीही तोडू नकोस. परंतु ब्रोकन लॉकेटमधील तुटलेलं हृदय अनुभवणे हीच खरी गंमत आहे. संदेश लिहिलेल्या पेंडंटचे दोन किंवा तीन असे भाग केले जातात आणि आपल्या खास मित्रांना भेट केले जातात. या लॉकेटचे वैशिष्टय़ म्हणजे हे तुकडे एकत्र केले की त्याचे एकसंध हृदय बनते. त्यामुळे ही भेटवस्तू तरुणांना सर्वाधिक आकर्षित करते.
टॅटू : हल्ली टॅटू काढणे हा प्रकार भलताच लोकप्रिय बनला आहे. मैत्री दिनानिमित्त मैत्रीचा संदेश देणारे टॅटू बाजारात उपलब्ध आहेत. कायमस्वरूपी नसले तरी त्या दिवसापुरते आपल्या मित्राच्या हातावर आपण दिलेला टॅटू पाहायला कोणालाही आवडेल.
फ्रिज मॅग्नेट : मैत्रीभावना व्यक्त करणारे फ्रिज मॅग्नेट (शीतकपाटाला लावले जाणारे चुंबक) यंदा बाजारात उपलब्ध आहेत.
पॉकेट डायरी : ही इतरांपेक्षा वेगळी भेटवस्तू ठाण्याच्या बाजारात तरुणांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये स्वीट फ्रेंड, यू आर द बेस्ट, स्पेशल फ्रेंड यांसारखे संदेश लिहिलेले आहेत.
लिफाफे : वेगवेगळ्या प्रकारचे स्माइलीजच्या आकारातील शुभेच्छापत्रे, रंगीबेरंगी लिफाफे हल्ली बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. कोलाज छायाचित्राच्या फ्रेम अशा भेटवस्तूंकडेही तरुणांची पसंती आहे.
फ्रेंडशिप बँड : नेहमीपेक्षा यंदा फ्रेंडशिप बँडमध्ये असंख्य प्रकार पाहायला मिळतात. आता तर खास मित्र-मैत्रिणीचे नाव लिहलेले बँडदेखील बाजारात तयार करून मिळतात.
मेसेजबॉटल
यंदाच्या मैत्री दिनाला कॅप्सूल बॉटल एक वेगळे आकर्षण ठरत आहेत. हाताच्या बोटाएवढय़ा असणाऱ्या या काचेच्या बरण्यांमध्ये रंगीबेरंगी थर्माकॉलचे गोळे टाकण्यात आले आहेत आणि त्यात तितक्याच छोटय़ा आकाराचा रंगीत कागद ठेवण्यात आला आहे. ज्यावर आपल्या हस्ताक्षरात मैत्रीविषयीच्या आपल्या भावना लिहून ही मेसेज बॉटल आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना देऊ शकतो. या कुपीत भरलेले गोळे म्हणजे औषधांच्या गोळ्याच आहेत की काय असा भास सुरुवातीला आपल्याला होतो. त्यामुळे भेट स्वीकारणारा मित्र काहीसा गडबडलेला दिसतो. मात्र, गोळ्यांच्या आकाराच्या थर्माकॉलवर लिहिलेला संदेश वाचून मैत्री दिनाचा आनंद द्विगुणित होतो.
जुन्या आठवणींची
फोटो फ्रेम
आपल्या बालपणीच्या मित्र-मैत्रणींसोबतचे फोटो एकत्र करून त्याचे कोलाज करणे हल्लीच्या तरुणांचा नवा ट्रेंड बनला आहे. त्यांना या अशा भेटवस्तू सुखद आठवणींनी रमण्यास मदत करतात. यासाठी वेगवेगळ्या आकर्षक फोटो फ्रेम उपलब्ध आहेत.
कुठे : राम मारुती रोडवरील सेलिब्रेशन, स्टेशन रोडवरील एरीस्टो, पाचपाखाडीतील एनक्स आदीं भेटवस्तूंच्या दुकानांमध्ये अशा असंख्य भेटवस्तू उपलब्ध आहेत. कोरम मॉल आणि विवियाना मॉलमध्ये या वस्तू मिळतात.
किंमत : १०० रुपये ते २००० रुपये.
कॉफी मग
प्रिय मित्र-मैत्रिणीविषयी कविता, संदेश लिहलेले कॉफी मग या दिवसात अधिक लोकप्रिय झाले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या मित्र-मैत्रीणीसोबतचे आपले छायाचित्र या मगवर छापून आपण देऊ शकतो.

The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ