सकाळ आणि सायंकाळ या गर्दीच्या वेळेत कळवा रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढणे आणि उतरणे शक्य होत नसल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत असतानाच, गुरुवारी सकाळी कळव्यातील काही प्रवाशांनी ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान रेल्वेच्या अधिकाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन कळवा किंवा पारसिक येथे होम प्लॅटफार्म उभारून तेथून लोकल सेवा सुरू  करण्याची मागणी करण्यात आली.

कळवा स्थानकातून विशेष लोकल सुविधा उपलब्ध नसून कसारा, कर्जत, कल्याण येथून येणाऱ्या लोकलगाडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे कळवा स्थानकातील प्रवाशांना त्या गाडय़ांमध्ये चढणे शक्य होत नाही. निवेदनामध्ये कळवा किंवा पारसिक येथे होम प्लॅटफार्म उभारून तेथून लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, पाचवी-सहावी मार्गिका आणि कळवा-एरोली उन्नत मार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याचीही मागणी केली आहे. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान रेल्वेच्या अधिकाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.